32 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेषकांदळवन क्षेत्रात अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्या

कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्या

वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

Google News Follow

Related

केंद्र सरकारप्रमाणेच राज्य शासनही पर्यावरण संतुलन आणि संवर्धनासाठी आग्रही आहे. कांदळवनाचे संरक्षण आणि संवर्धन हे महत्वाचे आहे. कांदळवन क्षेत्रात अतिक्रमण होणार नाही, यासाठी कडक पावले उचलावीत. तसेच कांदळवनाचे महत्व विद्यार्थी आणि सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कांदळवनांच्या विविध प्रजातींचे उद्यान विकसित करावे. त्यातून जनजागृती करावी. लोप पावत चाललेल्या प्रजाती वाचवण्यासाठी संवर्धन प्रकल्प हाती घ्यावी, असे निर्देश वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

महाराष्ट्र कांदळवन आणि जैवविविधता संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाची बैठक वन मंत्री मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते. मंत्री मुनगंटीवार म्हणाले की, राज्यात एकूण २० प्रजाती आहेत. आपल्या राज्यासह देशातील कांदळवन प्रजातींचे उद्यान आपल्या राज्यात असावे. याशिवाय, गोराई, दहिसर येथील कांदळवन पार्कचे काम गतीने करावे. कांदळवनासाठी ऊतीसंवर्धन तंत्राचा वापर करुन त्याच्या जतनासाठी काय करता येईल, याबाबत बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या सहकार्याने संशोधन प्रकल्प हाती घ्यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.

हेही वाचा..

गैरसोय टाळण्यासाठी कांदा खरेदी तातडीने सुरू करा

भाजपा अध्यक्ष नड्डा आरती करताना मोठी दुर्घटना टळली !

रेल्वे अपघात: मथुरा जंक्शन प्लॅटफॉर्मवर चढली रेल्वे गाडी

रायफल स्पर्धेत सिफ्ट कौर सामराची सुवर्ण, आशी चौक्सीची कांस्य पदकाला गवसणी

कांदळवन संशोधनासाठी काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना परदेशात अभ्यासासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. त्यामध्ये अधिक सुलभता आणावी. खाऱ्या पाण्यातील मत्स्य पालनासाठी केंद्रीय खारेपाणी मत्स्यपालन संस्था, चेन्नई यांच्या प्रशिक्षित वर्गाकडून राज्यातील मत्स्य पालकांना राज्यातच प्रशिक्षण देता येईल, अशी व्यवस्था निर्माण करण्याचे निर्देशही मंत्री मुनगंटीवार यांनी दिले. दलदलीच्या कांदळवन क्षेत्रात कांदळवन रोपवनाचे काम करणाऱ्या मजुरांवर आपत्ती ओढवल्यास त्यांना भरीव मदत द्यावी. कांदळवन क्षेत्रातील बदल तपासण्यासाठी एमआर सॅक यंत्रणेकडून अद्ययावत उपग्रह नकाशे प्राप्त करुन घेऊन कार्यवाही करावी, बहुप्रजातीय मत्स्यबीज ऊबवणी केंद्रासाठी कांदळवन प्रतिष्ठानच्या माध्यमातून कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

केंद्र शासनाच्या मिश्टी प्रकल्प आणि अमृत धरोहर योजनेंतर्गत दोन प्रस्ताव पाठविले आहेत. त्याचा पाठपुरावा करावा, असे निर्देशही मंत्री मुनगंटीवार यांनी दिले. कांदळवन क्षेत्र वाढविण्यासाठी यंत्रणेने अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा