भारतीय संघाने टी-२० विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर आता उत्साही भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष हे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेकडे आहे. पुढील वर्षी म्हणजेच २०२५ साली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा पाकिस्तान खेळवली जाणार असून याचे यजमानपद पाकिस्तान भूषवणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या वेळापत्रकाला आयसीसीने मंजुरी दिली आहे. मात्र, भारतीय क्रिकेट संघ चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाणार की नाही याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगल्या होत्या. यासंबंधीची एक नवीन अपडेट समोर आली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत खेळवली जाणार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) त्यासाठी तयारीही सुरू केली आहे. भारतीय संघाचे सर्व सामने लाहोर येथे खेळवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत १ मार्च २०२५ रोजी होणार असल्याची माहिती आहे. मात्र, या स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तानला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. ‘एएनआय’ या संदर्भात माहिती दिली आहे.
Indian Cricket team is unlikely to travel to Pakistan for the 2025 ICC Champions Trophy. BCCI will ask ICC to host matches in Dubai or Sri Lanka: BCCI sources to ANI pic.twitter.com/o7INJKhk1E
— ANI (@ANI) July 11, 2024
हे ही वाचा:
रेव्ह पार्टीत सापाचे विष वापरल्याप्रकरणी एल्विश यादवला समन्स
ब्रिटनमध्ये भारतीय वंशाच्या शिवानी राजा यांनी भगवद्गीता हातात घेऊन घेतली खासदारकीची शपथ
मराठा आरक्षणावरून विधानसभेत भाजपचे नेते कडाडले, विरोधकांची पळापळ!
मुस्लीम महिलाही पोटगी मागू शकतात
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय आयसीसीकडे दुबई किंवा श्रीलंकेत सामने आयोजित करण्याची मागणी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बीसीसीआयच्या या मागणीवर काय निर्णय घेणार, याकडे लक्ष असणार आहे. गेल्या वर्षी आशिया चषक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तानने केले होते, परंतु भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिला होता. याच कारणामुळे भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकेत झाले होते. १९९६ च्या विश्वचषकानंतरची ही पहिली आयसीसी स्पर्धा आहे जी पाकिस्तानमध्ये खेळवली जाणार आहे.