महिला क्रिकेटपटूंना बीसीसीआयची दिवाळीभेट, आता पुरुषांएवढेच मानधन

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

महिला क्रिकेटपटूंना बीसीसीआयची दिवाळीभेट, आता पुरुषांएवढेच मानधन

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज, २७ ऑक्टोबर रोजी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्व स्तरातून बीसीसीआयचे कौतुक होत आहे. बीसीसीआयने महिला आणि पुरुष क्रिकेटमधील भेदभाव संपवत सर्वांना समान मॅच फी मिळणार असल्याची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आम्ही आमच्या करारबद्ध महिला क्रिकेटपटूंसाठी वेतन समानता धोरण लागू करत आहोत, असं जय शाह यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

भारताचे क्रिकेटप्रेम हे जगविख्यात आहे. मात्र, बऱ्याचदा हे प्रेम पुरुष क्रिकेटर्सच्या बाबतीत जास्त दिसून येते. त्या प्रमाणात महिला क्रिकेटचे चाहते कमी दिसून येतात. याच पार्श्वभूमीवर महिला आणि पुरूष क्रिकेटर्सला समान मानधनाचा मुद्दा अनेकदा चर्चेत आला होता. अखेर बीसीसीआय यावर तोडगा काढत महिला आणि पुरुष खेळाडूंना समान मानधन मिळणार असल्याची घोषणा केली आहे.

जय शाह यांनी म्हटले की, मला जाहीर करण्यात आनंद होत आहे बीसीसीआय नव्या दिशेने पहिले पाउल टाकले आहे. अशा स्थितीत या धोरणांतर्गत आतापासून पुरुष आणि महिला दोघांसाठी समान मॅच फी समान असेल. यापुढे महिलांनाही पुरुषांइतकीच मॅच फी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. कसोटी क्रिकेटमधील एका सामन्यासाठी १५ लाख रुपये उपलब्ध आहेत. तर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुरुषांना एका सामन्यासाठी सहा लाख रुपये दिले जाणार आहे. तसेच, टी-20 सामन्यांसाठी तीन लाख रुपये दिले जाणार आहेत.

हे ही वाचा:

चित्रपट निर्माता कमल मिश्राने पत्नीला चिरडले

शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांचं निधन

कोणाचा दिवा विझतोय?

आता केजरीवाल म्हणतात नोटेवर गांधीजींसोबत लक्ष्मी-गणेशाचे चित्र छापा

दरम्यान, जुलैमध्ये प्रथम न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने महिला आणि पुरुष क्रिकेटर्सला समान मानधन देण्याची घोषणा केली होती.

Exit mobile version