आयसीसीच्या महसुलातून बीसीसीआयची कमाई १८ हजार कोटी

२०२४ ते २०२७ या चार वर्षांसाठी असेल हे नवे मॉडेल

आयसीसीच्या महसुलातून बीसीसीआयची कमाई १८ हजार कोटी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आगामी महसूल वाटपात भारतीय क्रिकेट बोर्डाची घसघशीत कमाई होणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड तथा बीसीसीआयला पुढील चार वर्षांत आयसीसीच्या कमाईतून ४० टक्के वाटा मिळणार आहे. म्हणजेच हा आकडा १८,८८६ कोटींच्या घरात जातो.

या महसूल वाटपाचे नवे मॉडेल हे प्रस्तावित आहे, पण तरीही भारतीय क्रिकेट बोर्डाला त्यातून प्रतिवर्षी १८ हजार कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळणार आहे. २०२४ ते २०२७ या चार वर्षांच्या कालावधीत ही रक्कम मिळेल. ती ३८.५ टक्के असून आयसीसीला मिळणारा महसूल हा ६० कोटी डॉलर इतका असेल त्यातून हा हिस्सा मिळणार आहे.

इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा हिस्सा मात्र कमी होणार आहे. त्यांना ४ कोटी डॉलर इतकी रक्कम मिळणार असून त्याचा टक्का हा ६.८९ इतकाच असेल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागेल. त्यांच्या खात्यात ३.७ कोटी डॉलर इतकी रक्कम जमा होऊ शकेल. त्याची टक्केवारी ६.२५ इतकी असेल.

यानंतर ३ कोटी डॉलरच्या कक्षेत ज्यांना कमाई करता येईल त्यात फक्त पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आहे. त्यांना ३.४ कोटी डॉलर इतका महसूल मिळू शकेल तो ५.७५ टक्के इतका असेल. त्यानंतरचे इतर पूर्ण सदस्य असलेले देश ५ टक्क्यांपेक्षा कमी महसूल मिळविणारे असतील. ६० कोटी डॉलरच्या आयसीसीच्या महसुलापैकी १२ पूर्ण सदस्यांना ५३.२ कोटी डॉलर इतका महसूल मिळणार आहे. तर उरलेल्यांना ६.७ कोटी डॉलर इतका महसूल मिळेल.

हे ही वाचा:

अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या तपासावर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार?

एक्झिट पोल सांगाताहेत कर्नाटकमध्ये काँग्रेस, पण भाजपलाही संधी

जालना नगरपालिका आता महानगरपालिका

राज्यात होणार ३०,००० शिक्षकांची मेगा भरती !

अफगाणिस्तानला १.६ कोटी, बांगलादेशला २.६ कोटी, आयर्लंडला १.८ कोटी, न्यूझीलंडला २.८ कोटी, दक्षिण आफ्रिकेला २.६ कोटी, श्रीलंकेला २.७ कोटी, वेस्ट इंडिजला २.७ कोटी, झिम्बाब्वेला १.७ कोटी इतका महसूल मिळेल.

या सगळ्या देशांना मिळणाऱ्या महसूलासाठी चार निकष असतील.
– त्यात एक म्हणजे क्रिकेटचा त्या देशाचा असलेला इतिहास.
– महिला आणि पुरुषांच्या गटात आयसीसी क्रिकेट प्रकारात गेल्या १६ वर्षांतील कामगिरी.
– आयसीसीच्या महसुलातील योगदान
– पूर्ण सदस्य असल्याचा फायदा

Exit mobile version