देशातील कोरोना परिस्थिती अधिक बिकट झाल्याने आणि त्याबरोबरच आयपीएलमधील काही खेळाडूंनाच कोरोनाची बाधा झाल्याने आयपीएल २०२१ च्या मोसमातील तब्बल ३१ सामने अजून बाकी आहेत. हे सामने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात युएईमध्ये खेळवले जाण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
ऑगस्ट महिन्यापासून भारतीय संघ इंग्लंडला जागतिक कसोटी क्रमवारीतील अंतिम सामन्यांसाठी जात आहे. यामध्ये पाच कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. यापैकी दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात ९ दिवसांचा वेळ आहे. हा वेळ कमी करून पाच दिवसांवर आणल्यास बीसीसीआयला काही अधिक दिवस प्राप्त होतील, त्यांचा वापर आयपीएलच्या मोसमाला पूर्ण करण्यासाठी करता येणार आहे. याबाबत बीसीसीआयने इसीबीसोबत अधिकृतरित्या काही संवाद सुरू केलेली नाही.
हे ही वाचा:
भारताचा आंतरराष्ट्रीय कुस्तीपटु सुशील कुमारला जालंधर येथून अटक
कोरोनाविरुद्ध नव्हे, मोदींविरुद्ध लढणारा मुख्यमंत्री!
मात्र या आराखड्यानुसार बीसीसीआयला संपूर्ण ३० दिवसांचा कालावधी प्राप्त होत आहे. यामध्ये एक दिवस भारतीय आणि इंग्लंडच्या संपूर्ण चमूला युएईमध्ये येण्यास लागणाऱ्या वेळेसाठी ठेवावा लागणार आहे. त्यासोबत पाच दिवस अंतिम फेऱ्यांसाठी लागणार आहे. त्यामुळे बीसीसीआयला २४ दिवसात २७ सामने खेळवावे लागणार आहेत. यात आठ शनिवार-रविवार मिळत असल्याने त्यादिवशी दोन दोन सामने खेळवून १६ सामने होऊ शकतात आणि इतर दिवशी एक एक सामना खेळवला जाऊ शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, जे संघ अंतिम सामन्यांत जाणार नाहीत, त्या संघातील खेळाडू परत त्यांच्या राष्ट्रीय संघांकडे जाऊ शकतात. त्याशिवाय आयपीएलनंतर होऊ घालेल्या टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी ही उत्तम तयारी ठरू शकेल असे देखील सांगितले जात आहे.