विश्वविजेत्या भारतीय संघाचे स्वागत आणि कौतुक करण्यासाठी मुंबईत क्रिकेट चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. संपूर्ण जगाचं लक्ष या सेलिब्रेशन आणि गर्दीकडे होते. हे सेलिब्रेशन पार पडताच ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी बीसीसीआयवर टीका करत टोमणा लगावला होता. आदित्य ठाकरे म्हणाले होते की, “मुंबईतील सेलिब्रेशन हे बीसीसीआयला थेट इशारा देणारे होते, यापुढे बीसीसीआयने कधीच विश्वचषकाचा अंतिम सामना मुंबईपासून दूर नेता कामा नये.” पण, यावर आता बीसीसीआयने आदित्य ठाकरे यांना जोरदार चपराक लगावत सुनावले आहे. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्टीकरण देत आदित्य ठाकरेंना सडेतोड उत्तर दिले आहे.
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केलं की, “फायनलचं ठिकाण ठरवणं हे बीसीसीआयचं काम आहे आणि ते करताना नेहमी एकाच शहराची निवड करता येणार नाही. १९८७ च्या विश्वचषकादरम्यान कोलकाता येथे अंतिम सामना झाला आणि कोलकाता हे शहर क्रिकेटसाठी मक्का (पवित्रस्थान) मानले जाते. दुसरं म्हणजे अहमदाबादच्या स्टेडियमची क्षमता १ लाख ३० हजार आहे आणि आम्हाला त्या क्षमतेचा देखील विचार करावा लागतो. कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियममध्ये सुद्धा सुमारे ६६ ते ८० हजार प्रेक्षक बसू शकतात. अन्य अनेक शहरांमध्ये सुद्धा मोठे स्टेडियम्स आहेत. आम्हाला निर्णय घेताना संपूर्ण देशातील सर्व ठिकाणांचा विचार करायचा असतो. तरीही मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये २०२३ ची उपांत्य फेरी पार पडली, सर्वच महत्त्वाचे सामने एकाच ठिकाणी मर्यादित करता येत नाहीत,” असे म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंच्या टोमण्यांना सडेतोड स्पष्टीकरण दिले आहे.
On Shiv Sena (UBT) leader Aaditya Thackeray's tweet "Never take away a World Cup final from Mumbai," BCCI Vice President Rajeev Shukla says, "I thank Mumbaikars who came in such large numbers to welcome the victorious Team India yesterday. Also, I would like to say that it is… pic.twitter.com/qGxiKVvTFx
— ANI (@ANI) July 5, 2024
याशिवाय, मुंबईत झालेल्या विजयी परेडदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी केलेल्या मेहनतीचे सुद्धा शुक्ला यांनी कौतुक केले. ते म्हणाले की, “मुंबईकरांचा प्रतिसाद हा भारावून टाकणारा होता त्यामुळे मुंबईला प्राधान्य देण्याचा आमचा प्रयत्न असतोच पण फायनल, सेमीफायनल कुठे आयोजित करावी हा निर्णय सर्वस्वी बीसीसीआयचा असावा. तसं पाहायला गेलं तर प्रत्येक सामना हा तेवढाच महत्त्वाचा असतो.”
हे ही वाचा:
ब्रिटननंतर इराणमध्येही सत्तांतर; हिझाब विरोधी नेता बनणार राष्ट्रपती
पुण्यात महिला वाहतूक पोलीसाच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न
‘सनातन’वरील पुस्तक शुभशकून ठरला!
तामिळनाडू बसपाच्या प्रदेशाध्यक्षांची धारदार शस्त्राने हत्या
यापूर्वीही, २०२३ मध्ये पार पडलेल्या आयसीसी वनडे विश्वचषकाचे यजमानपद हे भारताकडे होते. त्यावेळी अंतिम सामना अहमदाबादमध्ये झाल्यानेचं भारतीय संघ हरला असा समज करून राज्यातील अनेक राजकारण्यांनी बीसीसीआयवर टीका केली होती. भारताचा अंतिम सामना हा मुंबईत वानखेडेवर पार पडावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.