बस झाले! विश्वचषक २०२३च्या वेळापत्रकात आता बदल नाही

बीसीसीआयने धुडकावली हैदराबाद क्रिकेट असोसिशनची विनंती

बस झाले! विश्वचषक २०२३च्या वेळापत्रकात आता बदल नाही

भारतीय क्रिकेट बोर्डाने आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०२३च्या वेळापत्रकात आता अंतिम टप्प्यात बदल करणे योग्य नाही, असे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनला कळवले आहे. आता असोसिशननेही याला संमती दिली आहे. त्यामुळे हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर ९ आणि १० ऑक्टोबर असे सलग दोन दिवस विश्वचषकातील सामने होतील. विश्वचषक वेळापत्रकात आधीच बदल झाले आहेत. त्यामुळे हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने आधीच याबाबत मागणी केली असती तर त्यांचा हा प्रस्ताव मान्यही करता आला असता, असे सांगितले जात आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासक एल. नागेश्वर यांनी नियुक्त केलेल्या पथकातील सदस्य दुर्गा प्रसाद यांनी याबाबत अधिक माहिती दिली. ‘आम्ही बीसीसीआयशी चर्चा केली आहे आणि त्यांनी आता या वेळी वेळापत्रकात बदल करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आम्ही सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे,’ असे त्यांनी सांगितले. एचसीएच्या अधिकाऱ्यांनी खेळाच्या व्यवस्थापनाबाबत सोमवारी बीसीसीआयचे कार्यवाहक सीईओ हेमांग अमीन यांच्याशी दीर्घ चर्चा केली.

हे ही वाचा:

चीनच्या मुद्द्यावर राऊतांनी मालकाची री ओढली

एकदम ‘बेस्ट’; ताफ्यात दाखल होणार २४०० इलेक्ट्रिक बसेस

आठ कोटीच्या चिंधी घोटाळ्याचे धागेदोरेही कलानगरकडे बोट दाखवतायत…

५०० घरांची सोडत; गिरणी कामगारांना हक्काचे घर मिळणार

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी आता सामन्यांच्या व्यवस्थापनाच्या तयारीला लागले आहेत. ‘आम्ही आता सामन्यांच्या तयारीला लागलो आहोत. आम्ही शहरातील पोलिस आयुक्तांशीही चर्चा केली असून त्यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे,’ अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. हैदराबादमध्ये सलग दोन दिवस ९ आणि १० ऑक्टोबरला सामने होणार आहेत. मात्र एचसीए प्रशासनाला सुरक्षेच्या कारणास्तव असे सलग दोन सामने येथे होणे प्रशस्त वाटत नव्हते. त्यामुळे त्यांनी वेळापत्रक बदलण्याची मागणी केली होती.

 

९ ऑक्टोबरला हैदराबादमध्ये न्यूझीलंड आणि नेदरलँड दरम्यान सामना होईल. तर, दुसऱ्या दिवशी याच मैदानावर पाकिस्तान आणि श्रीलंकेमध्ये सामना रंगेल. दोन्ही सामने प्रकाशझोतात खेळवले जातील.

Exit mobile version