आयपीएलच्या टायटलमधून ‘टाटा’ला टाटा; बीसीसीआयकडून टायटल स्पॉन्सरसाठी टेंडर जारी

नवा टायटल स्पॉन्सर मिळण्याची शक्यता

आयपीएलच्या टायटलमधून ‘टाटा’ला टाटा; बीसीसीआयकडून टायटल स्पॉन्सरसाठी टेंडर जारी

जगातील सर्वात श्रीमंत आणि सुप्रसिद्ध क्रिकेट लीग म्हणजे इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल). यंदा आयपीएलमध्ये मोठा आणि महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर बदलण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने आयपीएलच्या २०२४- २०२८ या सीझनसाठी टायटल स्पॉन्सरबाबत टेंडर काढली आहे. त्यामुळे आता आगामी आयपीएलच्या सीझनपासून इंडियन प्रीमियर लीगला ‘टाटा आयपीएल’च्या ऐवजी दुसऱ्या नावाने ओळख मिळण्याची शक्यता आहे.

आयपीएलला पुढील सीझनसाठी नवा टायटल स्पॉन्सर मिळण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या २०२४-२०२८ सीझनच्या टायटल स्पॉन्सर अधिकारांसाठी निविदा जारी करण्याबाबत माहिती दिली आहे. BCCI ने निवेदनात म्हटलं आहे की, “इंडियन प्रीमियर लीगची (IPL) गव्हर्निंग कौन्सिल २०२४- २०२८ या सीझनसाठी लीगचे टायटल स्पॉन्सर अधिकार प्राप्त करण्यासाठी नामांकित संस्थांकडून बोली मागवत आहे.”

हे ही वाचा:

‘चकमकीत मारले गेलेले दहशतवादी त्याच जागी दफन’

ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे काळाच्या पडद्याआड

काश्मीरमध्ये दगड फेकणारी मुलगी बनली फुटबॉलपटू; पंतप्रधानांनी घेतली दखल

शिवराज सिंह यांना भेटून त्या महिलांनी केली अश्रूंना वाट मोकळी!

आयपीएलच्या टायटल स्पॉन्सरसाठी टाटा ग्रुपसोबतचा करार हा २०२४ सीझनच्या शेवटपर्यंत वैध होता आणि बीसीसीआयने आता त्यासाठी नवी निविदा काढल्या आहेत. दरम्यान, टाटा पुन्हा टेंडर भरू शकतात आणि पुन्हा आपलं नाव आयपीएलचं टायटल स्पॉन्सर म्हणून निश्चित करू शकतात. जर असं झालं तर पुन्हा पुढच्या चार वर्षांच्या कालावधीसाठी आयपीएलला ‘टाटा आयपीएल’ म्हणूनचं संबोधलं जाईल. भारत आणि चीन यांच्यातील राजकीय तणावामुळे ‘व्हिवो’ कंपनीनं माघार घेतली होती आणि त्यानंतर टाटा समुहाने ड्रीम- ११ कडून टायटल स्पॉन्सरशिप घेतली होती.

Exit mobile version