24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषभारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने मागवले अर्ज!

भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने मागवले अर्ज!

राहुल द्रविडचा कार्यकाळ लवकरच संपणार

Google News Follow

Related

भारतीय क्रिकेट मंडळाने (बीसीसीआय) सोमवार, १३ जून रोजी वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेसाठी अर्ज मागवले आहेत. राहुल द्रविडचा कार्यकाळ जूनमध्ये होणाऱ्या टी २० विश्वचषकानंतर संपणार आहे आणि सर्वात श्रीमंत असणाऱ्या क्रिकेट मंडळाने वरिष्ठ राष्ट्रीय संघातील सर्वोच्च पदाकरिता अर्ज करण्यासाठी २७ मे ही अंतिम मुदत निश्चित केली आहे.

बीसीसीआयने एका निवेदनात नमूद केले आहे की, ही जबाबदारी १ जुलै २०२४ ते ३१ डिसेंबर २०२७ या साडेतीन वर्षांच्या कालावधीसाठी असेल. उल्लेखनीय म्हणजे, एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर राहुल द्रविडना दिलेला मुदतवाढीचा कालावधी संपुष्टात येणार आहे. टी २० विश्वचषक स्पर्धा २९ जून रोजी संपेल. भारत २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि २०२७मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळणार आहे.

‘पदासाठी अर्ज २७ मे २०२४ रोजी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सादर करावेत. निवड प्रक्रियेमध्ये अर्जांचे सखोल पुनरावलोकन, त्यानंतर वैयक्तिक मुलाखती आणि निवडलेल्या उमेदवारांच्या मूल्यांकनाचा समावेश असेल,’ असे बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी गेल्या आठवड्यात पत्रकारांशी बोलताना राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज करण्यास पात्र असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आणि त्यांना आपोआप मुदतवाढ मिळणार नाही, हे स्पष्ट केले.
जय शाह यांनीही वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष संघासाठी परदेशी प्रशिक्षक असण्याची शक्यता नाकारली नाही. डंकन फ्लेचर हे टीम इंडियाचे शेवटचे परदेशी प्रशिक्षक होते.

तेव्हापासून, भारताकडे मुख्य प्रशिक्षक म्हणून केवळ माजी राष्ट्रीय संघाच्या खेळाडूंची निवड करण्यात आली. सुरुवातीला रवी शास्त्री, नंतर अनिल कुंबळे आणि आता राहुल द्रविड.
‘नवीन प्रशिक्षक भारतीय की विदेशी असेल हे आम्ही ठरवू शकत नाही. हे क्रिकेट समितीवर अवलंबून असेल आणि आम्ही एक जागतिक संस्था आहोत,’ असे शाह म्हणाले.

तुम्ही भारताच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी अर्ज करू शकता का?
बीसीसीआयने सोमवारी या पदासाठी आवश्यक पात्रता आणि कौशल्ये सूचिबद्ध केली आहेत.
* किमान ३० कसोटी सामने किंवा ५० एकदिवसीय सामने खेळलेले असावेत
* पूर्ण सदस्य असलेल्या कसोटी खेळणाऱ्या देशाचे किमान दोन वर्षे मुख्य प्रशिक्षक किंवा
* असोसिएट सदस्य/आयपीएल संघ किंवा समतुल्य आंतरराष्ट्रीय लीग/प्रथम श्रेणी संघ/राष्ट्रीय अ संघांचे मुख्य किमान ३ वर्षांच्या कालावधीसाठी प्रशिक्षक किंवा
* बीसीसीआयचे स्तर ३चे प्रमाणपत्र किंवा समतुल्य प्रमाणपत्र

हे ही वाचा:

पीओकेमधील निदर्शनांपुढे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले; निधी देण्याची घोषणा

पाकिस्तानमधील कट्टरपंथीयांच्या व्हॉट्सऍप ग्रुपशी संपर्कात असणारा नांदेडमधून ताब्यात

पंतप्रधान नव्हे, राहुल गांधी यांच्यासोबत वादविवादासाठी भाजपकडून रायबरेलीतील तरुण नेत्याची निवड

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे कर्करोगाने निधन

* वय ६० वर्षांपेक्षा कमी असावे.
राहुल द्रविडने डिसेंबर २०२१मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारला आणि तेव्हापासून ते संघाचे नेतृत्व करत आहेत. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली, भारताने २०२२ मध्ये टी२० विश्वचषकाची उपांत्य फेरी, २०२३ मध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची अंतिम फेरी आणि २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
भारताचा आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ १० वर्षांहून अधिक काळ कायम आहे आणि जर भारत अमेरिका आणि वेस्ट इंडिजमधून रिकाम्या हाताने परतला तर द्रविडला मंडळाची मान्यता मिळणार नाही.
बीसीसीआयद्वारे स्थापन करण्यात येणारी क्रिकेट सल्लागार समिती मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण करेल आणि मंडळाकडे त्याची शिफारस करेल, जी अखेरीस नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा करेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा