भारतीय क्रिकेट संघाने लता दीदींना वाहिली श्रद्धांजली

भारतीय क्रिकेट संघाने लता दीदींना वाहिली श्रद्धांजली

भारतरत्न लता मंगेशकर यांची आज सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. आज भारतीय क्रिकेट संघही ऐतिहासिक सामना वेस्ट इंडीज विरुद्ध खेळत आहे. भारत आज १००० वा एकदिवसीय सामना खेळत असून १००० वा सामना खेळणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. लता दीदींच्या निधनाच्या वृत्तानंतर बीसीसीआयने शोक व्यक्त केला आहे.

बीसीआय देशाच्या दुःखात सामील आहे. लता मंगेशकर यांनी अनेक दशके देशाला सूरांनी मंत्रमुग्ध केले. खेळाच्या आणि भारतीय संघाच्या त्या समर्थक होत्या. त्यांनी संगीताच्या माध्यमातून जागरूकता निर्माण करण्यात मदत केली, असे बीसीआयने ट्विटमध्ये म्हटले आहे.

भारतीय संघाचे खेळाडू हे दंडावर काळी फीत लावून मैदानावर उतरले आहेत. लता मंगेशकर यांना आदरांजली वाहण्यासाठी खेळाडूंनी काळ्या फीत लावल्या आहेत.

हे ही वाचा:

लतादीदींना पडणारे ते स्वप्न कोणते होते? समुद्राच्या लाटा त्यांच्या पायाला स्पर्श करत!

लता दीदींच्या निधनाने बॉलीवूडमध्ये शोककळा

लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर

‘लता मंगेशकर या देशाचा अभिमान होत्या’

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना आज अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या मालिकेपासून भारतीय संघाचे पूर्णवेळ कर्णधारपद रोहित शर्मा सांभाळत आहे. रोहितने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून दीपक हुडाने आज पदार्पण केले आहे. वेस्ट इंडीजकडून शाई होप आणि ब्रँडन किंग हे फलंदाजीसाठी मैदानात उतरले. पण भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने वेस्ट इंडीजला पहिला धक्का देत होपला (८) तंबूत धाडले आहे.

Exit mobile version