दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कोण संघात, कोणाला डच्चू ?

दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर! कोण संघात, कोणाला डच्चू ?

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समिती मार्फत बुधवार, ८ डिसेंबर रोजी आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. एकूण १८ जणांचा हा चमू असून ४ खेळाडूंना स्टॅन्ड बाय खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले आहे.

२६ डिसेंबरपासून भारताचा हा दक्षिण आफ्रिका दौरा सुरू होणार आहे. एकूण तीन कसोटी सामन्यांचा हा दौरा असून यातील पहिला सामना २६ ते ३० डिसेंबर दरम्यान सेंच्युरियन येथे खेळला जाणार आहे. तर ३ जानेवारी ते ७ जानेवारी या कालावधीत जोहान्सबर्ग येथे दुसरा सामना खेळला जाईल आणि त्यानंतर ११ ते १५ जानेवारी दरम्यान या मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना केप टाऊन येथे खेळला जाणार आहे.

या मालिकेसाठी भारतीय संघ खालीलप्रमाणे असणार आहे
विराट कोहली (कर्णधार) , रोहित शर्मा (उपकर्णधार), के.एल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज

स्टॅन्ड बाय खेळाडू: नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चाहर, अर्जन नागवासवाला

रवींद्र जडेजा, शुभमन गिल, राहुल चहर आणि अक्षर पटेल हे जखमी असल्यामुळे त्यांची निवड करण्यात आलेली नाही.

हे ही वाचा:

राष्ट्रपती, पंतप्रधानांनी वाहिली बिपीन रावत यांना श्रद्धांजली

पाकिस्तानमध्ये महिलांविरुद्ध तालिबानी अत्याचार

सीडीएस बिपीन रावत यांचे हेलीकॉप्टर अपघातात निधन

भारतीय संघाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर

दरम्यान रोहित शर्माकडे कसोटी संघाचे उपकर्णधार पद सोपवण्यात आले आहे. निवड समितीकडून हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. गेल्या काही मालिकांमध्ये उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्या सादरीकरणात घसरण झाल्यामुळे या चर्चांना उधाण आले होते. गेल्या काही मालिकांमध्ये अजिंक्य रहाणे हा सातत्याने अपयशी होताना दिसला आहे. त्यामुळेच अजिंक्य रहाणे याला संघातून डच्चू दिला जाऊ शकतो आणि उपकर्णधार पदही त्याच्याकडून परत घेतले जाऊ शकते असा अंदाज वर्तविण्यात येत होता. त्यानुसार आता अजिंक्य रहाणे कडून कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात आले आहे.

Exit mobile version