वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपसाठी भारतीय संघ जाहीर

वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपसाठी भारतीय संघ जाहीर

आयसीसीच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. भारतीय क्रिकेट महामंडळाच्या निवड समितीने शुक्रवार, ७ मे रोजी हा संघ घोषित केला आहे. न्यूझीलंड विरोधात भारत खेळणार असणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपच्या अंतिम सामन्यासाठी तसेच इंग्लंड विरोधात खेळल्या जाणाऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी हा संघ असणार आहे.

आयसीसीने सुरु केलेल्या वर्ल्ड क्रिकेट चॅम्पियनशिप या अनोख्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी भारत आणि न्यूझीलंड हे दोन संघ पात्र ठरले आहेत. हा अंतिम सामना १८ ते २२ जून दरम्यान इंग्लंडमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यानंतर ४ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. हा भारतीय संघ पुढीलप्रमाणे असणार आहे.

हे ही वाचा:

१०० कोटींच्या बोजाने दबलेल्या बार मालकांबाबत कळकळ पाहून कंठ दाटून आला

मराठा आरक्षणासाठी नाही, बार मालकांसाठी पवारांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र

परदेशातून महाराष्ट्राला मिळालेल्या मदतीबद्दल मविआत मतभेद

मुंबईतल्या निवासी डॉक्टर्सची महापालिकेकडून लूट?

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत, आर अश्विन, रवींद जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकुर, उमेश यादव. असा हा संघ असणार आहे तर के.एल राहुल आणि ऋद्धिमान साहा यांच्या दुखापतीवर त्यांची निवड अवलंबून असणार आहे. अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि अरजान नागवासवाला या खेळाडूंना स्टॅन्ड बाय खेळाडू म्हणून स्थान मिळाले आहे.

Exit mobile version