बीसीसीआयची मोठी घोषणा; खेळाडूंना मिळणार एवढी रक्कम

बीसीसीआयची मोठी घोषणा; खेळाडूंना मिळणार एवढी रक्कम

भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडला नमवून पाचव्यांदा अंडर १९ क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरले. अंडर १९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सर्वात यशस्वी संघ म्हणून भारताची ओळख आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने स्पर्धेतील सर्व सामने जिंकत दमदार कामगिरी केली. अंतिम सामन्यातील विजयानंतर भारतीय संघाचे सर्वच स्तरातून कौतुक होत असताना बीसीसीआयने देखील खेळाडूंच्या कामगिरीची दखल घेत त्यांचे कौतुक केले आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या सर्व खेळाडूंसाठी आणि सपोर्ट स्टाफसाठी मोठी घोषणा केली आहे. विश्वचषक स्पर्धेच्या संघातील प्रत्येक खेळाडूला ४० लाख आणि सपोर्ट स्टाफच्या प्रत्येक सदस्याला २५ लाखाचे बक्षीस जय शाह यांनी जाहीर केले आहे. त्यांनी ट्वीट करत ही माहिती दिली. तुम्ही अभिमानास्पद कामगिरी केल्याचे शाह यांनी ट्वीटमध्ये म्हटले.

बीसीसीआय अध्यक्ष यांनीही संघाचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनीही बीसीसीआयने केलेल्या घोषणेबद्दल माहिती दिली असून हे अगदीच छोटे बक्षीस आहे तुमचे कष्ट, मेहनत हे अमूल्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

भारताने पाचव्यांदा विश्वचषकावर नाव कोरत रचला इतिहास!

तीस हजारहून अधिक सापांना जीवनदान देणारा हा ‘स्नेक मास्टर’ आहे कोण? वाचा सविस्तर

आठवीत शिकणाऱ्या मुलीवर लैगिंग अत्याचार करणाऱ्या दोघांना अटक

‘महाराष्ट्रात सातत्याने लोकशाहीचा मुडदा पाडू नका’

अँटिग्वाच्या सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर झालेल्या अंडर १९ विश्वचषक स्पर्धेत भारताने विश्वचषकावर आपलं नाव कोरत इतिहास रचला. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडवर ४ गडी आणि १४ चेंडू राखत विजय मिळवला. यश धुलच्या नेतृत्वाखालील भारताने या स्पर्धेत उत्कृष्ट खेळ दाखवला. त्यांनी स्पर्धेत आतापर्यंत खेळलेले सर्व सामने जिंकले. भारताने आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच पाच वेळा अंडर १९ विश्वविजेतेपद पटकावले आहे.

Exit mobile version