भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या कसोटी आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. एकूण १८ जणांच्या संघाची घोषणा करण्यात आली असून कसोटी मालिकेचे कर्णधारपदही रोहित शर्मा याच्याकडे सुपूर्त करण्यात आले आहे. तर याच वेळी माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांना डच्चू देण्यात आला आहे.
या महिना अखेरपासून श्रीलंकन संघाचा भारत दौरा सुरू होत आहे. या दौऱ्यात तीन टी-२० सामने आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. लखनऊ आणि धर्मशाला या ठिकाणी हे टी-२० सामने खेळले जातील. तर मोहाली आणि बंगलोर येथे कसोटी सामन्यांची मालिका रंगेल. दुखापतीच्या काय नसतो के. एल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोघेही या मालिकेला मुकणार आहेत. तर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याला आराम देण्यात आला आहे. तर टी-२० मालिकेसाठी विराट कोहलीलाही विश्रांती देण्यात आली आहे. या दोन्ही मालिकांसाठी जसप्रीत बुमराह हा भारताचा उपकर्णधार असेल.
हे ही वाचा:
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते १०० ‘किसान ड्रोन्स’ ना हिरवा झेंडा
देवेंद्र फडणवीस किरीट सोमय्यांच्या भेटीला
‘छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम…..
भारताचा टी-२० संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चाहर, दीपक हुडा, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान
भारताचा कसोटी संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी.