पद्मभूषण विजेते भैरप्पा म्हणतात, बीबीसीची डॉक्युमेंट्री देशाचे नाव खराब करण्यासाठी

गोध्रातील हत्याकांडावर विरोधक काहीही बोलत नाहीत

भारत जी-२० देशांचे अध्यक्षपद भूषवत असताना बीबीसीने पंतप्रधान नरेंद्र मोदी २००२च्या दंगलीला कारणीभूत होते असा निष्कर्ष काढणारी डॉक्युमेंट्री हे एक षडयंत्र आहे. यातून भारताची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न आहे, अशी टिप्पणी प्रख्यात लेखक, कादंबरीकार आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते एस.एल. भैरप्पा यांनी केली आहे.

पद्मभूषण पुरस्काराने भैरप्पा यांना गौरविण्यात आले असून त्यानिमित्ताने त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हेच टीकाकार गोध्रात झालेल्या हत्याकांडावर मात्र मूग गिळून गप्प असताना असेही भैरप्पा म्हणाले. भैरप्पा हे समान नागरी कायदा भारतात लागू व्हायला हवा या मताचेही आहेत. सगळ्यां कायदे आणि नियम हे सारखेच असले पाहिजेत, असे ते म्हणतात.

बीबीसीची ही डॉक्युमेंट्री भारतात बंदी घालण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाने या दंगलीसंदर्भात जो निर्णय दिला, त्याचा आधार घेत टीकाकारांना उत्तर द्यायला हवे होते, असेही मत त्यांनी मांडले आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान साधणार विद्यार्थ्यांशी संवाद ..देणार गुरुमंत्र

कॅप्टन अमरिंदर सिंग महाराष्ट्राचे नवे राज्यपाल होण्याचे संकेत

भारतात दक्षिण आफ्रिकेतून १०० हून अधिक चित्ते येणार

व्ह जिहादचे नेमके चित्रण करणाऱ्या ‘आवरण’ कादंबरीचे लेखक भैरप्पांना पद्मभूषण

भैरप्पा म्हणाले की, मला केंद्र सरकारने पद्मभूषण पुरस्कार दिला आहे म्हणून मी त्यांची तारीफ करत नाही. पण मी राजकारणाविषयी खूप वाचन केले आहे. अर्थात माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी कोणताही संबंध नाही. इतिहासाचेही खूप वाचन मी करतो. मला आनंद आहे की सध्या हे सरकार केंद्रात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, त्यामुळे मला हा पुरस्कार मिळाला अन्यथा हा पुरस्कार मला मिळू शकला नसता, असेही त्यांनी सांगितले.

इंडिया द मोदी क्वेश्चन या नावाची ही डॉक्युमेंट्री बीबीसीने रिलीज केली असून त्यात नरेंद्र मोदी हेच कसे त्या २००२च्या दंगलीला कारणीभूत होते, हे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. भारतात त्या डॉक्युमेंट्रीच्या प्रसारणास बंदी घालण्यात आली असून सोशल मीडियावर त्याच्या लिंक्सवरही बंदी आहे.

Exit mobile version