उबाठाचे नेते संजय राऊत यांनी सामनामधून भाजपवर केलेल्या आरोपावर भाजपकडून अजूनही टीका केली जात आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या ट्विटरवर काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा एक व्हिडिओ पोस्ट करत संजय राऊतांवर पुन्हा निशाणा साधला आहे.आदरणीय मोदीजींवर टिका करण्याआधी मल्लिकार्जुनबुवांचा हा व्हिडीओ बघा आणि ठरवा, अशी पोस्ट बावनकुळे यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी ‘सामनाच्या रोखठोक’ लेखातून भाजपवर गंबीर आरोप केले होते.यामध्ये त्यांनी नितीन गडकरींच्या पराभवासाठी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केल्याचे म्हटलं होत.तसेच फडणवीसांनी रसद पुरवली असं संघाचे लोक सांगतात, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
हे ही वाचा:
‘आप’चा पाय खोलात; मानहानीच्या खटल्यात आतिशी यांना समन्स
विरारच्या अर्नाळा समुद्रात बोट उलटली, एकाचा मृत्यू!
पावसाळ्यातील संकटांना तोंड देण्यास यंत्रणा सज्ज
दिल्लीतील आग; मालकाने परवान्याशिवाय चालवली चक्क तीन रुग्णालये
संजय राऊत… तुमचे नेते मल्लिकार्जुन खरगे बघा काय म्हणतात?
आदरणीय मोदीजींवर टिका करण्याआधी
मल्लिकार्जुनबुवांचा हा व्हिडीओ बघा!! आणि ठरवा.मल्लिकार्जुनबुवा खरगे स्वतःला देवाचे अवतार म्हणू लागले.
"मेरा नाम है मल्लिकार्जुन खरगे.. मैं ईश्वर का अवतार हूं…"यांच्यावरही भ्रष्टलेख… pic.twitter.com/raHIo7CgIE
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) May 28, 2024
तसेच अमित शाहांच्या हाती पुन्हा सत्ता आली तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील, असेही लेखातून म्हटले होते.राऊतांच्या आरोपानंतर भाजपने जोरदार टीका केली अन ती अजूनही सुरूच आहे.भाजपचे बावनकुळे यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये खर्गे स्वतःला देवाचा अवतार असल्याचे सांगत आहेत.यावरून बावनकुळेंनी राऊतांवर निशाणा साधला आहे.
बावनकुळे यांनी म्हटले की, संजय राऊत… तुमचे नेते मल्लिकार्जुन खरगे बघा काय म्हणतात?, आदरणीय मोदीजींवर टिका करण्याआधी मल्लिकार्जुनबुवांचा हा व्हिडीओ बघा!! आणि ठरवा.ते पुढे म्हणाले, मल्लिकार्जुनबुवा खरगे स्वतःला देवाचे अवतार म्हणू लागले. “मेरा नाम है मल्लिकार्जुन खरगे.. मैं ईश्वर का अवतार हूं…”यांच्यावरही भ्रष्टलेख लिहा, असं बावनकुळे म्हणाले.