दिल्लीच्या सफदरगंज हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन दरम्यान एका १३ वर्षांच्या मुलाच्या पोटात वेगवेगळ्या अशा ५६ प्रकारच्या वस्तू सापडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामध्ये बॅटरी, चेन, स्क्रू, ब्लेड आणि नट-बोल्ट इत्यादींचा समावेश आहे.मात्र, डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही मुलाला वाचवता आले नाही. रविवारी (२७ ऑक्टोबर २०२४) झालेल्या या ऑपरेशनचे डॉक्टरांनी दुर्मिळ प्रकरण म्हणून वर्णन केले आहे. दरम्यान, या वस्तू मुलाच्या पोटात कशा पोहोचल्या याची माहिती अद्याप समजू शकलेले नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आदित्य शर्मा असे मृताचे नाव असून तो आपल्या कुटुंबासह हातरस येथील रत्ननगरभा कॉलनीत राहत होता. आदित्यचे वडील संकेत शर्मा यांनी सांगितले की, १३ ऑक्टोबर रोजी मुलाला पोटदुखी आणि श्वास घेण्यास त्रास होत होता. आदित्यला उपचारासाठी हातरस येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी जयपूरच्या एसडीएमएच रुग्णालयात दाखल करण्यात आले. पाच दिवस उपचार झाल्यानंतर मुलाची तब्बेत ठीक झाली आणि त्याला घरी आणण्यात आले.
हे ही वाचा :
भारताची न्यूझीलंडपुढे सपशेल शरणागती, कसोटी मालिकेत ०-३ हार
पुन्हा सत्ता आल्यास पाणी आणि वीज बिले माफ करणार
कॅनडा आता अधिकृतपणे भारताला ‘राज्य शत्रू’ म्हणून संबोधले
नसीम सोलंकी पूजेनंतर गंगेच्या पाण्याने मंदिर पवित्र केले
संचेत शर्मा पुढे म्हणाले, १९ ऑक्टोबर रोजी आदित्यला पुन्हा श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याला अलिगडमधील एका खासगी रुग्णालयात दाखवण्यात आले. येथे, सीटी स्कॅननंतर, आदित्यच्या नाकात एक गाठ दिसली जी २६ ऑक्टोबर रोजी शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आली. ऑपरेशननंतर श्वसनाचा त्रास दूर झाला, पण पोटदुखी सुरूच होती. त्याच दिवशी आदित्यचा अल्ट्रासाऊंड करण्यात आला आणि त्याच्या पोटात १९ वस्तू आढळून आल्या. त्यामुळे त्याला उपचारासाठी नोएडा येथे आणण्यात आले. त्यावेळी आदित्यच्या पोटात १९ नव्हे तर ५६ वस्तू असल्याचे आढळून आले.
अखेर आदित्यला ऑपरेशनसाठी दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर २७ ऑक्टोबर रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिये दरम्यान त्याच्या पोटातून घड्याळाच्या बॅटरी, ब्लेडचे तुकडे, खिळे, काचेचे तुटलेले भाग, नट-बोल्ट, नाणी, सेंट, चेन आणि इतर काही धातू सापडले. सामान्य व्यक्तीच्या हृदयाचे ठोके ६० ते १०० च्या दरम्यान असतात, परंतु उपचाराच्या वेळी आदित्यचे प्रमाण २८० च्या आसपास होते. दरम्यान, डॉक्टरांनी पूर्ण प्रयत्न केले परंतु, आदित्यला वाचवण्यात यश आले नाही. या वस्तू आदित्यच्या पोटात कसे पोहोचले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही डॉक्टरांनी याचे वर्णन पिका सिंड्रोम सारखे मानसिक आजार म्हणून केले आहे. या सिंड्रोममध्ये एखादी व्यक्ती खाण्यायोग्य नसलेल्या गोष्टी देखील खाऊ लागते.