‘बटेंगे तो कटेंगे’ आशयाचे मुंबईत लागले पोस्टर्स

विधानसभा निवडणुकीच्या आधी मुंबईत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो असलेले आणि बटेंगे ते कटेंगे असा संदेश देणारी पोस्टर्स मुंबईच्या अनेक भागांत लागली आहेत. याबद्दल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, हे फोटो पक्षाने लावलेले नाहीत मात्र मतांचे विभाजन झाल्यास समाजाचे नुकसान होईल असे अनेकांना वाटते, असे ते म्हणाले.

याबाबत आमदार शेलार यांनी पीटीआयला सांगितले की, पक्षाने पोस्टर लावलेले नाहीत आणि ज्यांचे नाव त्यावर आहे त्या राय यांना पक्षात कोणतेही पद नाही. या संदेशाचा संदर्भ देताना शेलार म्हणाले, मते कापली तर विकासाअभावी समाजाचे नुकसान होईल, ही लोकांची भावना आहे. अनेकांना वाटते की त्यांनी एकजूट राहून एकजुटीने मतदान करण्यावर भर द्यावा.

हेही वाचा..

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : हत्येपूर्वी स्नॅपचॅटचा वापर झाला

हसीना अजूनही पंतप्रधान आहेत का?, राष्ट्रपती शहाबुद्दीन म्हणाले- माझ्याकडे त्यांचा राजीनामा नाही!

गँगस्टर छोटा राजनला जामीन

जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात दिवाळी कार्यक्रमादरम्यान राडा

विशेष म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते योगी आदित्यनाथ यांनी ऑगस्टमध्ये लोकांना समृद्धीच्या शिखरावर पोहोचण्यासाठी एकजूट राहण्याचे आवाहन केले होते आणि बांगलादेशातील चुका भारतात होऊ नयेत असे म्हटले होते. आग्रा येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले, आप देख रहे हैं बांग्लादेश में क्या हो रहा है? वो गलतियाँ यहाँ नहीं होना चाहिये. बटेंगे तो कटेंगे! एक रहेंगे तो नेक रहेंगे, सुरक्षित रहेंगे और समृद्धी की परकष्ट को पाहुंगे,” असे ते म्हणाले होते.

Exit mobile version