उत्तर प्रदेशातील बरेली आणि मुरादाबाद जिल्ह्यात ‘घरवापसी’च्या दोन वेगळ्या घटना घडल्या आहेत, जिथे मुस्लिम मुलींनी इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर हिंदू तरुणांशी लग्न केले. उल्लेखनीय म्हणजे, बरेलीमध्ये, मूळची रामपूरची रहिवासी असलेल्या फरहानाने हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर तिचे नाव बदलून पल्लवी ठेवले. तर, मुरादाबादची रहिवासी असलेल्या नर्गिसने तिचे नाव बदलून मानसी ठेवले. या दोघांनीही आपला हिंदू धर्मावर दीर्घकाळापासून विश्वास असल्याचे सांगत तिहेरी तलाक आणि हलालच्या भीतीपासून मुक्त असल्याचे सांगितले.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिली घटना बरेलीच्या शाही भागातील आहे. मंगळवारी रामपूरची रहिवासी असलेली फरहाना तिचा हिंदू प्रियकर धर्मवीरसोबत बरेली येथील अगत्स्य मुनी आश्रमात पोहोचली. ती तिच्या कुटुंबासह चंडिगडमध्ये राहत होती, जिथे बरेलीचा रहिवासी धर्मवीर त्याच्या नातेवाईकांसह काम करत असे. पाच वर्षांपूर्वी त्यांची भेट झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला; मात्र, फरहानाच्या कुटुंबाचा या नात्याला विरोध होता.
अगत्स्य मुनी आश्रमात, तिने सर्व आवश्यक कागदपत्रे आणली आणि पंडित के. के. शंखधर यांना घरवापसी आणि धर्मवीर सोबत लग्नासाठी विधी करण्यास सांगितले आणि ती प्रौढ आहे असे प्रतिपादन केले. तिच्या विनंतीवरून, फरहानाच्या घरवासीसाठी शुद्धीकरण विधी करण्यात आला आणि सनातन धर्म स्वीकारल्यानंतर तिने पल्लवी हे नाव धारण केले. वैदिक रीतिरिवाजांचे पालन करून, तिने तिचा प्रियकर, धर्मवीर याच्यासोबत वैवाहिक जीवनात प्रवेश केला. हिंदू धर्मावर दीर्घकाळापासून आपली श्रद्धा असून तिहेरी तलाक आणि हलालाच्या भीतीपासून मुक्त असल्याचे तिने सांगितले.
हे ही वाचा:
भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीचा फुटबॉलला अलविदा!
चाललंय काय? भारत चंद्रावर पोहोचला, कराचीतली मुले मात्र गटारात!
१४ हजार ५०० फूट उंचीवर मिळणार चीनला सडेतोड उत्तर
ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याचे सुवर्णयश
दुसरे प्रकरण उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्याशी संबंधित आहे. सोमवारी (१३ मे) नर्गिस तिचा प्रियकर सुनीलसोबत आर्य समाज मंदिरात पोहोचली. आपण प्रौढ असल्याचे सांगत नर्गिसने सुनीलशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. दोघेही एकाच गावातील रहिवासी असून शेतात एकत्र काम करायचे. ते वारंवार एकमेकांच्या घरी जात. काही दिवसांतच त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले. मात्र, जेव्हा त्यांनी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा नर्गिसच्या घरच्यांनी विरोध केला.
सोमवारी मुरादाबाद येथील आर्य समाज मंदिरात वैदिक रितीरिवाजांनुसार त्यांचा विवाह झाला. यावेळी प्रचंड आनंद व्यक्त करताना नर्गिसने आता तिहेरी तलाक आणि हलालापासून मुक्त झाल्याचे नमूद केले. नर्गिसने लहानपणापासूनच हिंदू धर्माकडे कल असल्याचे स्पष्ट केले.नर्गिसच्या कुटुंबीयांनी सुनीलवर नर्गिसला फूस लावून पळून गेल्याचा आरोप करत एफआयआर दाखल केला आहे. तरीही, सुनीलचे नातेवाईक नर्गिस सून म्हणून घरी येण्याची आतुरतेने वाट पाहात आहेत.