लखनऊच्या एका सलूनमधील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सलूनमधील न्हाव्याने ग्राहकाच्या तोंडाची मालिश करण्यासाठी आपल्या थुंकीचा वापर केल्याचे समोर आले आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून आरोपी आरोपी झैदला अटक करण्यात आली आहे. या किळसवाण्या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
उन्नाव येथील रहिवासी असलेला आणि कॅन्टीनमध्ये काम करणारा पंडित आशिष कुमार हा व्यक्ती ११ जून रोजी सलूनमध्ये मसाजसाठी गेला असताना ही घटना घडली. सलूनमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी झैद हा स्वतःच्या हातावर थुंकून तोच हात ग्राहकाच्या तोंडावर लावून मालिश करताना दिसत आहे. सुरवातील ग्राहक कुमारने न्हाव्याकडून दाढी करून घेतली त्यानंतर चेहऱ्याचा मसाज करण्यास सांगितले.
हे ही वाचा..
अमर्याद संपत्ती गोळा करणाऱ्या वक्फ बोर्डाला चाप लावणार कोण?
त्रस्त पॅलेस्टाईनला भारताकडून आशा
‘तृणमूल काँग्रेसला मते मिळालेल्या भागातच विकासकामांसाठी पैसा’
रेणुकास्वामी हत्येचा बेंगळुरू पोलिसांनी असा लावला छडा!
आरोपी झैदने ग्राहकाच्या चेहऱ्याची मालिश करण्यास सुरुवात केली. सुरवातीला ग्राहकाला काही वाटले नाही परंतु काही वेळानंतर त्याला संशय आला. त्यानंतर त्याने सलूनमध्ये बसवलेले सीसीटीव्ही तपासले आणि त्याला धक्काच बसला. न्हावी स्वतःच्या हातावर थुंकून त्याचा वापर तोंडावर करत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसले. यानंतर ग्राहक आशिष कुमारने पोलीस ठाणे गाठत न्हाव्याची तक्रार दाखल केली. ग्राहकाच्या तक्रारीच्या आधारे लखनऊ पोलिसांनी न्हावी झैदला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, अशा धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.