इस्रायल-हमास वाद जुना आहे पण आता तो शिगेला पोचला!

बराक ओबामांची इस्रायलवर टीका

इस्रायल-हमास वाद जुना आहे पण आता तो शिगेला पोचला!

इस्रायल-हमासच्या युद्धावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा बोट ठेवत इस्रायलवर टीका केली आहे.पॅलेस्टिनींसोबत जे घडत आहे ते असह्य’ असून आतापर्यंत या युद्धात चार हजारांवर लेकरांचा अंत झाल्याचे ओबामा म्हणाले.इस्रायल-हमास युद्धाचे विश्लेषण करताना ओबामांनी आपल्या हजारो माजी सहकाऱ्यांना सांगितले की, प्रत्येकजण या नरसंहारात सहभागी आहे. कोणाचेही हात निष्कलंक नसल्याचे ते म्हणाले.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी इस्रायल-हमास युद्धावर सडकून टीका केली. इस्रायल-हमासचा हा वाद शेकडो वर्षे जुना असून आता तो शिगेला पोहचला आहे.तसेच लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी त्यांनी सोशल मीडियाला देखील जबाबदार धरले आहे.ओबामा यांनी ७ ऑक्टोबर रोजी इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध तर केलाच, ज्यात शेकडो इस्रायली लोक मरण पावले, पण पॅलेस्टिनींच्या वेदनाही त्यांनी बोलून दाखवल्या आहेत.

माजी कर्मचार्‍यांसह पॉडकास्टमध्ये, बराक ओबामा म्हणाले की, ‘मी ते पाहतो आणि आश्चर्यचकित होतो. मी कितीही प्रयत्न केले तरीही माझ्या कार्यकाळात ते निराकरण करण्यासाठी मी काय केले असते. पण माझ्या आतून नेहमी आवाज येतो, मी काही वेगळे करू शकलो असतो का? इस्रायल-हमास युद्धाचे विश्लेषण करताना ओबामांनी आपल्या हजारो माजी सहकाऱ्यांना सांगितले की, प्रत्येकजण या नरसंहारात सहभागी आहे. कोणाचेही हात निष्कलंक नाहीत.

हे ही वाचा:

बेंगळुरूत महिला भूवैज्ञानिकाची चाकूने हत्या!

एक कोटीची लाच स्वीकारणाऱ्या अभियंत्याला रंगेहाथ पकडले!

गाझामध्ये युद्धबंदीसाठी अरब नेत्यांचा अमेरिकेवर दबाव!

एकनाथांच्या मदतीला एकनाथ धावले!

अमेरिकेचे माजी अध्यक्ष म्हणाले, ‘हा शतकानुशतके जुना वाद आहे, जो आता शिगेला पोहोचला आहे. हमासने जे केले ते भयंकर आहे आणि त्याचे कोणतेही स्पष्टीकरण देता येणार नाही. आणि हेही खरे आहे की पॅलेस्टिनींसोबत जे काही होत आहे ते असह्य आहे. इस्रायल गाझा पट्टीवर सतत बॉम्बफेक करत आहे, ज्यामुळे आतापर्यंत सुमारे १० हजार पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. या युद्धात आतापर्यंत चार हजारांवर लेकरांचा मृत्यू झाला आहे.

ते पुढे म्हणाले की, ‘मी नुकतेच जे बोललो ते खूप प्रेरणादायी वाटेल. पण तरीही आपण मुलांना मरण्यापासून कसे रोखू शकतो याचे उत्तर हे देत नाही. ओबामा यांनी त्यांच्या माजी सहाय्यकांना संपूर्ण सत्य समजून घेण्याची गरज असल्याचे सांगितले. इस्रायल-हमास युद्धात समतोल निर्माण व्हावा यासाठी त्यांनी पाठिंबाही मागितला.

बराक ओबामा पुढे म्हणाले, ‘ज्यू लोकांचा स्वतःचा इतिहास आहे हेही खरे आहे. जोपर्यंत तुमचे आजी आजोबा, काका किंवा काकू तुम्हाला सेमिटिक विरोधी कथा सांगत नाहीत तोपर्यंत ते डिसमिस केले जाऊ शकते. आणि सध्याच्या परिस्थितीत माणसे मारली जात आहेत हेही खरे आहे. ते लोक मारले जात आहेत ज्यांचा हमासशी काहीही संबंध नाही. गाझा पट्टीत होत असलेल्या इस्रायलच्या हवाई हल्ल्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

Exit mobile version