ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहिरी यांचे निधन

ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहिरी यांचे निधन

हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ संगीतकार बप्पी लहिरी यांचे निधन झाले आहे. मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात बप्पी लहिरी यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 69 वर्षांचे होते.

मुंबईमधील क्रिटी केअर रुग्णालयात बप्पी लहरी गेल्या एक महिन्यापेक्षा अधिक काळ ऍडमिट होते. पण या आठवड्यात सोमवार, १४ फेब्रुवारी रोजी त्यांना डिस्चार्ज मिळाला. हॉस्पिटलमधून त्यांना मुंबई येथील राहत्या घरी आणण्यात आले, पण मंगळवारी अचानक त्यांची तब्येत पुन्हा खालावली.

त्यांच्या कुटुंबीयांनी त्वरित डॉक्टरांना घरी बोलावले. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी पुन्हा त्यांना ऍडमिट करण्याचा सल्ला दिला. तेव्हा बप्पी लहिरी यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. त्यांना प्रकृतीच्या अनेक तक्रारी होत्या.

हे ही वाचा:

संजय राऊत यांचा ‘साडे तीन’ चा फ्लॉप शो…

मोहित कंबोज म्हणतात, म्हणून संजय राऊत यांना घाम फुटला!

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार?

लाल किल्ल्याच्या आंदोलनातील आरोपी अभिनेता दीप सिद्धू कार अपघातात मृत्युमुखी

बप्पी लहिरी हिंदी चित्रपट सृष्टीतील अतिशय नावाजलेले संगीतकार आणि गायक होते. ८० आणि ९० च्या दशकात त्यांच्या संगीताने आणि गायकीने लोकांना भुरळ घातली होती. त्यांनी हिंदी चित्रपटांना दिलेले संगीत आणि गायलेली अनेक गाणी लोकप्रिय ठरली. २०२० साली बागी ३ या चित्रपटासाठी त्यांनी शेवटचे गाणे म्हटले. काही दिवसांपूर्वी ते कलर्स वाहिनीवरील प्रसिद्ध अशा बिग बॉस या रियालिटी शोच्या पंधराव्या पर्वात विशेष अतिथी म्हणून आलेलेही पाहायला मिळाले होते. तर अनेकदा इंडियन आयडॉल, सा रे ग म प आशा संगीत रियालिटी कार्यक्रमांमध्येही ते विशेष परीक्षक किंवा अतिथी अशा भूमिकेत दिसायचे.

बप्पी लहिरी यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. आपल्या ट्वीटमध्ये पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, बप्पी लहिरी यांचे संगीत सर्वसमावेशक, विविध भावना सुंदरपणे व्यक्त करणारे होते. पिढ्यानपिढ्या लोक त्यांच्या संगीताचे चाहते राहिले आहेत. त्यांचा जिंदादिल स्वभाव सर्वांच्या लक्षात राहणारा आहे. त्यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांप्रती संवेदना. ओम शांती.

Exit mobile version