चार लाखांच्या सोनसाखळीसोबत बाप्पाच्या मूर्तीचं केलं विसर्जन आणि…

बंगळूरूमध्ये कुटुंबीयांनी ६० ग्रॅम सोन्याच्या साखळीसह गणपती बाप्पाचे विसर्जन केले

चार लाखांच्या सोनसाखळीसोबत बाप्पाच्या मूर्तीचं केलं विसर्जन आणि…

गणेशोत्सवाची धामधूम देशभरात सुरू असून नुकतेच पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन झाले. एकीकडे गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू असताना दुसरीकडे बंगळूरूमध्ये एक वेगळीच घटना घडल्याचे समोर आले आहे. बेंगळुरूमध्ये पाच दिवसांच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करत असताना तब्बल चार लाख रुपयांची ६० ग्रॅम सोन्याच्या साखळीसह गणपती बाप्पाचे विसर्जन केल्याचा प्रकार समोर आला आहे.

कर्नाटकमधील बंगळुरुमध्ये रामय्या आणि उमादेवी या जोडप्याने मोठ्या उत्साहात गणपती बाप्पाला घरी आणले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या घरगुती गणपतीचं विसर्जन केलं. विसर्जन करून घरी येताचं या दाम्पत्याच्या लक्षात आले की गणपती बाप्पाच्या मूर्तीवर चढवलेली खरी सोनसाखळी विसर्जन करताना काढून ठेवलीच नव्हती. त्यांनी तसेच बाप्पाचे विसर्जन केले. ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने बाप्पाचे विसर्जन केले त्या ठिकाणी धाव घेतली. मात्र, संबंधित कंत्राटदाराने पाणी उपसण्यास त्यांना नकार दिला म्हणून त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

हे ही वाचा : 

कोस्टल रोड प्रकल्प गेमचेंजर

संजौली मशिदीच्या विरोधात व्यापारीही उतरले, बाजारपेठा बंद !

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त अजमेर शरीफ दर्ग्याच्यावतीने ४ हजार किलो अन्नवितरण

प्रशिक्षणार्थी सैनिकाला बांधून मैत्रिणीवर बलात्कार?

पोलिसांना घडलेला प्रसंग सांगताच पोलिसांनी घटनास्थळी येत प्रशासनाच्या मदतीने साखळीचा शोध घेण्यास सुरुवात केली. तब्बल १० तास हे कुटुंबीय साखळीचा शोध घेत होते. या साखळीच्या शोधासाठी १० हजार लिटर पाणी बाहेर काढण्यात आलं. साखळी शोधण्यासाठी म्हणून कंत्राटदाराने आणखी काही मदतनीस मुले बोलावून घेत त्यांना साखळी शोधण्याच्या कामाला लावलं होतं. त्यानंतर अखेर १० तासांच्या प्रतीक्षेनंतर ही साखळी सापडली. यानंतर या कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला. या जोडप्याला त्यांची हारवलेली सोनसाखळी परत मिळाल्याने इतरांनीही समाधान व्यक्त केलं.

Exit mobile version