‘महाराष्ट्रासाठी झटला, बहुजनांसाठी राबला, प्रस्थापितांना खुपला’

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या समर्थनात बॅनरबाजी

‘महाराष्ट्रासाठी झटला, बहुजनांसाठी राबला, प्रस्थापितांना खुपला’

महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार स्थापन होताच सरकारकडून जनकल्याणासाठी अनेक योजना, उपक्रम, अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात आल्या आणि अजूनही राबवण्यात येत आहेत. महायुती सरकार हे ‘गोर गरिबांचे सरकार’ असून तळागाळातल्या लोकांपर्यंत सर्व सरकारी योजनांचा लाभ पोहचवणे आणि राज्यातील महिलांना सशक्त करण्याचे काम आमचे सरकार करत आहे, असा सुरवातीपासूनच नारा मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आहे.

सरकारच्या अनेक योजनांमुळे राज्यभर ‘महायुती सरकार’चे कौतुक होत आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार यांच्या समर्थनात राज्यामध्ये बॅनरही झळकत आहेत. असाच एक बॅनर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनात लावण्यात आला आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

हे ही वाचा :

चेंबूरमध्ये भीषण आगीत सात जणांचा मृत्यू

हिमालयात अडकलेल्या युके, युएसच्या महिलांची सुटका

जम्मू-काश्मीर: निकालापूर्वी दहशतवाद्यांचा कट हाणून पाडला, शस्त्रे-स्फोटके जप्त!

स्त्री शक्तीचा जागर: स्वराज्याच्या पहिल्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई!

‘महाराष्ट्रासाठी झटला, बहुजनांसाठी राबला, प्रस्थापितांना खुपला’, असा उल्लेख असलेला बॅनर उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या समर्थनात लावण्यात आला आहे. छत्रपती संभाजी नगरमध्ये हे बॅनर लागले आहेत. या बॅनरवरून फडणवीसांच्या कामाची पोच पावती असल्याची चर्चा होत आहे. या बॅनरच्या माध्यमातून विरोधकांवर निशाणा साधण्यात आला असून बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनात छत्रपती संभाजी नगरमध्ये हे बॅनर झळकले आहेत. हे बॅनर कोणी लावले?, याचे मात्र नाव अद्याप समोर आलेले नाही. परंतु, या बॅनरची सर्वत्र चर्चा आहे.

Exit mobile version