देशात आणि राज्यात बांगलादेशी रोहिंगे यांच्या घुसखोरीचे प्रकार रोज बाहेर येत असताना आता ठाणे शहरातही तीन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली. ठाण्यातील प्रसिद्ध आणि अत्यंत वर्दळीच्या अशा वर्तकनगर परिसरात ही कारवाई करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
माहितीनुसार, वर्तकनगर पोलिसांनी सांगितले की, पोलिसांनी माहिती मिळताच छापा टाकला तेव्हा एका खोलीत तीन महिला आढळल्या. त्या येथे बेकायदेशीरपणे राहत होत्या. या महिलांकडे भारतात प्रवेशासाठी कोणतीही वैध कागदपत्रे नव्हती. अटक करण्यायात आलेल्या महिला या सुमारे २२ ते ४५ या वयोगटातील आहेत. त्या ठाण्यातील एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होत्या.
हे ही वाचा :
बांगलादेश न्यायालयाने हिंदू साधू चिन्मय दास यांचा जामीन अर्ज फेटाळला!
सात महीने खदखदणारे मस्साजोग कांड, निर्णायक वळणावर…
क्रीडा विभागात २१ कोटींचा घोटाळा करणारा मुख्य आरोपी गजाआड!
तिनही महिला बांगलादेशच्या नागरिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या महिलांविरोधात पासपोर्ट कायदा आणि परदेशी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या महिलांना भारतात बेकायदेशीरपणे राहण्यास आणि काम करण्यास कोणी मदत केली याचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी तपास सुरू आहे. यामध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का? याचा तपास केला जात आहे.