बंगालच्या सीमेवर बांगलादेशी तस्करांचा बीएसएफ जवानांवर हल्ला, कारवाईत एक ठार !

भारत-बांगलादेश सीमेवर मोठ्या संख्येने जवान तैनात

बंगालच्या सीमेवर बांगलादेशी तस्करांचा बीएसएफ जवानांवर हल्ला, कारवाईत एक ठार !

बांगलादेशात अंतरिम सरकार स्थापन होऊन देखील हिंसाचाराच्या घटना अजूनही काही ठिकाणी सुरु आहेत. देशातील वाढत्या हिंसाचाराने भारत-बांगलादेश सीमेवर घुसखोरी होऊ नये यासाठी बीएसएफचे जवान नजर ठेवून आहेत. याच दरम्यान पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात भारत-बांगलादेश सीमेवर जवान आणि तस्करांमध्ये चकमक झाली. हे तस्कर बांगलादेशात अवैध वस्तूंची तस्करी करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी बीएसएफच्या जवानांनी त्यांना अडवले असता तस्करांनी धारदार शस्त्रांनी जवानांवर हल्ला केला. स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तर देत जवानांनी एका तस्कराला ठार केले आणि दारू आणि शस्त्रे जप्त केली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) ने सांगितले की, ही घटना ११-१२ ऑगस्टच्या रात्री घडली, जेव्हा तस्करांच्या एका गटाने बलाच्या दक्षिण बंगाल सीमांतर्गत १५५ व्या बटालियनच्या चांदनीचक सीमा चौकीवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांवर हल्ला केला.

बीएसएफच्या निवेदनात म्हटले की, या भागात गस्त घालणाऱ्या एका बीएसएफ जवानाने पाहिलं की, पाच ते सहा जण आपल्या डोक्यावर सामान घेऊन भारताकडून बांगलादेशच्या दिशेने जात आहेत. जवानाने त्यानं लगेच थांबायला सांगितले. परंतु, याकडे दुर्लक्ष करून घुसखोर झुडपात लपले आणि त्याचवेळी त्यांच्यातील एका गटाने धारदार शस्त्रांनी जवानांवर हल्ला केला. जवानांनी स्वसंरक्षणार्थ दोन राऊंड गोळीबार केला. गोळीबारानंतर हल्लेखोर जंगलात पळून गेले. यानंतर पथकाने शोध मोहीम सुरु केली असता अब्दुल्ला नावाचा एका बांगलादेशी तस्करी जखमी अवस्थेत सापडला. यानंतर त्याला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र, त्याचा मृत्यू झाला. अब्दुल्ला हा बांगलादेशातील चापई नवाबगंज जिल्ह्यातील ऋषिपारा गावचा रहिवासी आहे.

 

हे ही वाचा :

नवी मुंबईतून पाच बंगलादेशींना अटक

वनविभागाच्या जमिनीवर बेकादेशीर चर्च, धर्मांतराच्या तक्रारीनंतर बुलडोझरची कारवाई !

१९७१ च्या बांगलादेशच्या शहीद स्मारकातील पुतळेच फोडले!

महाराष्ट्राच्या विकासासाठी थिंक टॅंक म्हणून ‘मित्र’ कार्यरत

 

Exit mobile version