बांगलादेशात आंदोलकांनी ‘बंगबंधू शेख मुजीबुर रहमान’ यांचा पुतळा फोडला !

लष्कर प्रमुखांकडून शांतता राखण्याचे जनतेला आवाहन

बांगलादेशात आंदोलकांनी ‘बंगबंधू शेख मुजीबुर रहमान’ यांचा पुतळा फोडला !

बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेली निदर्शने आता नियंत्रणाबाहेर गेली आहेत. देशभरात हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. देशातील बिकट परिस्थिती पाहता शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. हसीना शेख यांनी बांगलादेश सोडून भारतात दाखल झाल्या आहेत. दरम्यान, निदर्शनादरम्यान, हिंसक आंदोलकांनी बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्याची तोडफोड केली आहे. हातोड्याने त्यांचा पुतळा फोडल्याचा फोटो देखील समोर आले आहेत.

बांगलादेशच्या राजकारणात शेख मुजीबूर रहमान यांचा दर्जा भारतातील महात्मा गांधींसारखाच आहे. बांगलादेशात मुजीबूर रहमान यांना बंगबंधू म्हणून ओळखले जाते. आंदोलक इतके संतप्त झाले आहेत की त्यांनी बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या पुतळ्यावर चढून हातोड्याने घाव घातले. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आंदोलक ढाका येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानात घुसले आहेत. निवास्थानाची तोडफोड करत सामानाची लुटू केली गेली. आंदोलक पंतप्रधानांच्या निवासस्थानातील सामान घेऊन जातानाचे व्हिडिओ देखील समोर आलेले आहेत.

हे ही वाचा..

बांगलादेशातील सत्तापालटानंतर बीएसएफकडून सर्व सीमेवर ‘हाय अलर्ट’

शेख हसीना यांचा पंतप्रधान पदाचा राजीनामा, लष्कर घेणार ताबा!

गणपतीसाठी चाकरमान्यांचा एसटीला उदंड प्रतिसाद !

सेन्सेक्स २,५०० अंकांनी घसरला, निफ्टीतही घसरण

दरम्यान, शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आणि देश सोडल्यानंतर लष्कराने देशाची कामात आपल्या हाती घेतली आहे. बांगलादेशचे लष्करप्रमुख जनरल वकार उझ जमान यांनी पत्रकार परिषद घेत याची घोषणा केली. देशात लवकरच शांतात नांदेल आणि लोकांना शांतता राखण्याचे आवाहन लष्कर प्रमुखांनी केले.

Exit mobile version