बांग्लादेश चीनच्या कह्यात जाणार नाही!

बांग्लादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांचे स्पष्टीकरण

बांग्लादेश चीनच्या कह्यात जाणार नाही!

बांग्लादेशच्या परराष्ट्रमंत्र्यांचे स्पष्टीकरणबांग्लादेशमध्ये सत्ताधारी अवामी लीग पक्षाने सर्वसाधारण निवडणुकीत विक्रमी विजय मिळवला. या विजयानंतर पंतप्रधान शेख हसिना यांनी भारत हा आपला विश्वासू मित्र असल्याचे जाहीर केले होते. आता बांग्लादेशचे परराष्ट्रमंत्री डॉ. एके अब्दुल मोमेन यांनीही ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत भारत-बांग्लादेश नाते, चीनशी संबंध आदींबाबत भाष्य केले. बांग्लादेश चीनच्या कह्यात जाणार नाही, भारताने याबाबत चिंता करू नये, अशी स्पष्टोक्ती त्यांनी यावेळी केली.

भारत-बांग्लादेश नाते तुम्ही पुढे कसे नेणार, या प्रश्नावर त्यांनी सकारात्मक उत्तर दिले. ‘आमचे नाते खूप मजबूत आहे. आणि हे आतापासूनच नव्हे तर आमच्या जन्मापासून आहे. आमच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी भारताने आम्हाला मोठी मदत केली होती. आमच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनीही रक्त सांडले आहे. त्यामुळे आमच्याकडे त्यासाठी ऐतिहासिक कारणही आहे. गेल्या काही वर्षांत पंतप्रधान शेख हसिना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये एक चांगले नाते निर्माण झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी या नात्याला एक सुवर्णअध्याय संबोधले आहे आणि आम्हाला तो पुढे सुरू ठेवायचा आहे. आम्ही व्यूहात्मक भागीदारी विकसित केली असून आम्हाला भारत आणि बांग्लादेश यांच्यासह आमच्या सर्व शेजारी राष्ट्रांशी चांगले नाते निर्माण करायचे आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

तीन दिवसांत ३० टक्के पर्यटकांची मालदीवकडे पाठ!

बंदुका घेऊन तोंडावर मास्क लावून थेट चॅनलच्या स्टुडिओत घुसले आणि…

अमेरिकेत राम मंदिराचा उत्साह; राम भक्तांनी काढली शोभायात्रा

बेंगळुरूस्थित सीईओ महिलेने आपल्या मुलाला मारून टाकत आत्महत्येचा केला प्रयत्न

मालदीव असो की बांग्लादेश… चीनचा या भागातील प्रभाव वाढत असल्याकडे तुम्ही कसे पाहता, यावरही त्यांनी मत व्यक्त केले. ‘हा चुकीचा समज आहे. बांगलादेशवर चीनचा खूप प्रभाव नाही. चीन हा आमचा विकासाचा भागीदार आहे. ते आम्हाला आमच्या काही प्रकल्पांमध्ये साथ देत आहेत, मग ते कंत्राटदार म्हणून असो किंवा तज्ज्ञ म्हणून. आम्हाला चीनकडून मिळणाऱ्या आर्थिक निधीकडे पाहिल्यास तो देशाच्या राष्ट्रीय ठोकळ उत्पन्नाच्या (जीडीपी) एक टक्काही नसल्याचे दिसून येईल.

बांग्लादेश चीनच्या कर्जाखाली दबला जातोय, हा प्रोपगंडा आहे. एखाद्या देशाचे परदेशी कर्ज ५५ टक्क्यांच्या वर असेल तर देश अन्य देशाच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला जातोय, असे म्हणात येऊ शकते. आमचे असे एकूण अर्ज केवळ १३.६ टक्के आहे. भारत व्यक्त करत असलेली भीती अनाठायी आहे. चीन हा मित्र आणि विकासाचा भागीदार आहे. आम्ही मदत किंवा निधी घेण्यास सदैव व्यावहारिक दृष्टिकोन बाळगतो. त्यामुळे बांग्लादेश चीनच्या कह्यात जातोय, ही भीती अनाठायी आहे,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version