बांगलादेश हिंसाचार; हिंदू गायकाचे घर जाळले, ९७ ठिकाणी हिंदूंवर हल्ले !

अजूनही परिस्थिती हाताबाहेर

बांगलादेश हिंसाचार; हिंदू गायकाचे घर जाळले, ९७ ठिकाणी हिंदूंवर हल्ले !

शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर बांगलादेशात हिंदूंवरील हल्ले तीव्र झाले आहेत. बांगलादेशात हिंसाचार थांबत नाही. लष्कराने देशाचा ताबा घेतला असला तरी अजूनही परिस्थिती तशीच आहे. या हिंसाचारात आंदोलकांनी बांगलादेशात हिंदूंना मोठ्या प्रमाणात लक्ष्य केले आहे. हिंदूंवर हल्ले करून त्यांची घरे लुटली जात आहेत. तसेच अनेक हिंदूंची हत्या देखील करण्यात आल्याची बातम्या समोर आल्या आहेत.

सोशल मीडियावर बांगलादेशातील हिंसाचाराचे व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये हिंदूंवर हल्ले करण्यात आल्याचे व्हिडिओ देखील समोर आले आहेत. व्हिडिओंमध्ये हिंदूंना मारहाण आणि मंदिरे जाळण्यात आल्याचे दिसत आहे. बांगलादेशात अल्पसंख्याकांसोबतच शेख हसीना यांच्या पक्षाशी संबंधित नेत्यांनाही लक्ष्य करून त्यांची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

बांगलादेशातील इस्लामिक कट्टरतावादी शक्तींनी ढाका येथील धनमंडी येथील प्रसिद्ध बांगलादेशी हिंदू गायक राहुल आनंद यांच्या १४० वर्षे जुन्या घरावर हल्ला केला. यादरम्यान एका हिंदू गायकाच्या घराला बदमाशांनी आग लावली, ज्यात ३ हजारांहून अधिक वाद्ये जळून खाक झाली. आग लावण्यापूर्वी त्यांच्या घरातील साहित्य लुटण्यात आले. यावेळी राहुल आनंदच्या कुटुंबीयांनी अज्ञात स्थळी पळून कसा तरी जीव वाचवला.

हे ही वाचा..

बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतीय कांद्याला फटका, सीमेवर शेकडो ट्रक ठप्प !

“विनेश तू देशाची चॅम्पियन आणि अभिमान आहेस…” अपात्रतेनंतर पंतप्रधान मोदींनी केले सांत्वन

बांगलादेशात संतप्त जमावाने प्रसिद्ध अभिनेत्यासह वडिलांची मारहाण करत केली हत्या !

धक्कादायक! विनेशचे १०० ग्रॅम वजन अधिक, ऑलिम्पिकमधून अपात्र

बांगलादेशातून आलेल्या वृत्तानुसार, सोमवार आणि मंगळवारी झालेल्या हिंसाचारात हिंदू आणि अल्पसंख्याकांना किमान ९७ ठिकाणी लक्ष्य करण्यात आले. या काळात हिंदूंची घरे, दुकाने लुटून जाळण्यात आली. किमान १० हिंदू मंदिरांवरही हल्ले झाल्याची माहिती आहे.

Exit mobile version