बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणतात, रोहिंग्या हे बांगलादेशावरचे मोठे ओझे’

बांगालादेशात ११ लाख रोहिंग्यांमुळे गुन्हेगारीत वाढ

बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणतात, रोहिंग्या हे बांगलादेशावरचे मोठे ओझे’

स्थलांतरित रोहिंग्या हे बांगलादेशावर एक “मोठे ओझे” आहेत. ते त्यांच्या मायदेशी परतावेत यासाठी बांगलादेश ही समस्या आंतरराष्ट्रीय समुदायाकडे घेऊन जात आहे. मला वाटते की भारत हा प्रश्न सोडवेल. ही समस्या साेडवण्यात भारत मोठी भूमिका बजावू शकतो, असं मत बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी व्यक्त केलं आहे. साेमवारपासून बांग्लादेशच्या पंतप्रधान चार दिवसांच्या भारत दाैऱ्यावर येत आहेत.

बांगलादेशातील लाखो रोहिंग्यांच्या उपस्थितीमुळे बांगलादेश प्रशासनासमोर अनेक आव्हाने उभी राहिली असल्याचे शेख हसीना यांनी एनएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत मान्य केले. त्या पुढे म्हणाल्या की, राेहिंग्या हे आमच्यासाठी मोठे ओझे आहे. भारत हा एक मोठा देश आहे. भारत त्यांना सामावून घेऊ शकतो. भारतात रोहिंग्यांची संख्या तितकी नाही. बांगलादेशात ११ लाख रोहिंग्या आहेत. त्यामुळे आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायांशी आणि शेेजारी देशांशी चर्चा करत आहोत. ते अशी काही पाऊले उचलू शकतात जेणे करून जेणेकरून रोहिंग्या त्यांच्या देशात परत जाऊ शकतील.

आमच्या सरकारने मानवतावादी दृष्टीकाेनातून न विस्थापित समुदायाची काळजी घेण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना राहण्यासाठी जागा आणि सर्वकाही दिले. कोरोना महामारीच्या काळात संपूर्ण रोहिंग्या समुदायाचे लसीकरण केले. पण ते इथे किती दिवस राहू शकतात? असा प्रश्नही पंतप्रधान हसीना यांनी उपस्थित केला. रोहिंग्या अडचणीत हाेते त्यावेळी आमच्या देशाने त्यांना आश्रय दिला होता, पण आता त्यांनी त्यांच्या देशात परतले पाहिजे असंही मत त्यांनी व्यक्त केलं.

रोहिंग्यांनी त्यांच्या देशात परतावे

बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणाले की, रोहिंग्या स्थलांतरितांना शिबीरात ठेवण्यात आले आहे. यामुळे आपल्या पर्यावरणाला धोका निर्माण होतो. काही रोहिंग्या अंमली पदार्थांची तस्करी, गुन्हेगारी घटना आणि महिला तस्करीत गुंतलेले आहेत. दिवसेंदिवस त्या वाढत आहेत. त्यामुळे ते लवकरात लवकर त्यांच्या देशात परतले तर आमच्या देशासाठी चांगले आहे. ते म्यानमारसाठीही चांगले आहे. त्यामुळे आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आसियान किंवा युनो आणि आंतरराष्ट्रीय समुदाय तसेच इतर देशांबराेबर आम्ही चर्चा करत आहोत.

Exit mobile version