बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांची सुटका करण्यात आली आहे. खालिदा झिया या हसीना शेख यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. २००७ मध्ये बांगलादेशातील निवडणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या वेळी स्थापन झालेल्या कार्यकारी सरकारने खालिदा झिया आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी २०१८ मध्ये त्यांना १७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर राष्ट्रपतींनी खलिदा झिया यांच्या सुटकेचे आदेश दिले. त्यानंतर त्यांची आज सुटका करण्यात आली. खालिदा झिया या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) प्रमुख आहेत.
बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आदेश दिल्यानंतर १७ वर्षांची शिक्षा झालेल्या खालिदा झिया यांची आज सुटका करण्यात आली आहे. २००७ मध्ये खालिदा झिया आणि त्यांच्या दोन मुलांविरुद्ध भ्रष्टाचाराचा खटला दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना २०१८ साली शिक्षा सुनावण्यात आली होती. खलिदा २०१८ पासून तुरुंगात होत्या. आता त्यांची सुटका झाली असून खालिदा झिया यांची चीनची समर्थक म्हणून ओळख आहे. त्यामुळे आता तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांची पुढची खेळी काय असेल याकडे सर्वांचे लक्ष्य आहे. तसेच खालिदा हानिया या सध्या ७८ वर्षांच्या असून अनेक आजारांनी त्रस्त आहेत. योग्य उपचारांसाठी ती अनेक परदेशातही जात असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
अगदी कमी वेळेत हसिना यांनी केली भारतातील आश्रयाबद्दल विनंती
विनेश फोगटची उपांत्य फेरीत धडक, दणदणीत सामना जिंकला !
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना फिजीच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित !
बांगलादेशमध्ये आंदोलकांनी तुरुंग पेटवताचं ५०० कैद्यांसह अनेक दहशतवादी पळाले
दरम्यान, बांगलादेशात हिंसाचाराचे प्रमाण अधिक वाढले आहे. हसीना शेख यांच्या राजीनाम्यानंतर लष्कराने देशाचा ताबा घेतला आहे. परंतु काही ठिकाणी अजूनही हिंसाचार सुरु आहे.