बांगलादेशचे खासदार अनवारुल अजीम अनार हे बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली आहे. ते भारतात आल्यानंतर बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांचे शेवटचे लोकेशन बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये आढळून आले आहे. त्यामुळे बांगलादेशमधील त्यांच्या कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशमधील अनवारुल यांच्या कुटुंबीयांनी ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांच्या गुप्तहेर शाखेकडे मदत मागितली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून अनवारुल संपर्काबाहेर आहेत. बांगलादेशमध्ये जेनैदाह-४ मतदारसंघातून अनवारुल हे तीन वेळा खासदार राहिले आहेत. अनवारुल अजीम हे बेपत्ता झाल्याची माहिती त्यांची मुलगी मुमतरीन यांनी दिली आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी यासंदर्भात पोलिसांकडे मदत मागितली आहे. उपचारासाठी अनवारुल अजीम भारतात आले होते. त्यानंतर ते गायब झाले आहेत. अनवारुल यांच्या मुलीने गुप्तहेर शाखेचे प्रमुख आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त हारुन-या-रशीद यांची भेट घेतली होती.
बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनवारुल बेपत्ता झाल्यानंतर भारतीय विशेष कार्य बलाशी संपर्क साधण्यात आला. कानाचा त्रास असल्याने ते भारतात आले होते. यासंदर्भात ते नेहमी भारतात येत असतात. बांगलादेशच्या पंतप्रधान कार्यालयाने देखील याची दखल घेतली आहे.
हे ही वाचा:
संसदेची सुरक्षा केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे!
मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या घरांतून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे रेकॉर्डर जप्त!
मणिपूरमध्ये दोन तास चकमक; कुकी दहशतवाद्यांपासून ७५ महिलांची सुटका
भाजपच्या उमेदवाराला आठवेळा मत; व्हिडीओतील तरुणाला उत्तर प्रदेश पोलिसांकडून अटक
माहितीनुसार, ढाका पोलीस हे भारतीय पोलिसांसोबत मिळून काम करत आहे. खासदारांचा शोध घेतला जात आहे. अनवारुल यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन बिहारच्या मुजफ्फरपूरमध्ये मिळाले आहे. ते १२ मे रोजी भारतात आले होते. याठिकाणी ते गोपाळ नावाच्या व्यक्तीच्या घरी थांबले. सकाळी नाष्टा करुन ते घराबाहेर पडले. पण, रात्री ते घरी आले नाहीत. तीन दिवसांपासून ते बेपत्ता आहेत. त्यांच्यासी संपर्क देखील होत नाही आहे.