बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या कृती आणि चुकांचे विश्लेषण करणाऱ्या अहवालाने मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील शासनाचा पर्दाफाश केला आहे. हसीना शेख यांनी देश सोडल्यानंतर बांगलादेशाचे नेतृत्व मुहम्मद युनूस यांच्या हाती आले आणि आता यांच्या सरकारला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, या दरम्यान झालेल्या हिंसाचारात अल्पसंख्यांक बळी पडले, विशेष करून हिंदू समाज. हिंदूवर अत्याचार झाले हे खरे आहे, तश्या बातम्या, व्हिडीओ देखील समोर आले आहेत. मात्र, मुहम्मद युनुस यांनी हिंदुंवरील हिंसाचाराचे वृत्त नाकारले आणि बहुतांश गोष्टी अतिशयोक्त केल्या जात असल्याचे म्हटले. परंतु, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचा अहवाल समोर आला आहे, ज्यामध्ये अल्पसंख्यांवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
बांगलादेशातील महंमद युनूस सरकारच्या पहिल्या १०० दिवसांत हिंदूंसह अल्पसंख्याकांना त्रास सहन करावा लागला आहे, असे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालातून समोर आले आहे. हसीना शेख नंतरच्या काळात जातीय हिंसाचाराच्या २,०१० घटनांचा उल्लेख करण्यात आला आहे आणि गुन्हेगारांना ओळखण्यासाठी आणि त्यांना शिक्षा करण्यासाठी प्रयत्नांची कमतरता असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
बर्लिनस्थित नागरी समाज संस्थेच्या बांगलादेश शाखेच्या ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल बांगलादेशच्या (TIB) अहवालात असेही नमूद करण्यात आले आहे की, ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान शेख हसीना यांना हिंसक निदर्शने करून पळून जाण्यास भाग पडल्यानंतर मतभेद असलेल्यांना हिंसाचाराचा सामना करावा लागला. ५ ते २० ऑगस्ट दरम्यान जातीय हिंसाचाराच्या २,०१० घटना घडल्या” ज्यामुळे ‘अल्पसंख्याक समुदायातील नऊ लोकांचा मृत्यू झाला’, असे अहवालात म्हटले आहे.
हे ही वाचा :
निज्जरच्या हत्येची कल्पना पंतप्रधान मोदींना असल्याचा आरोप हास्यास्पद
जम्मू- काश्मीरमध्ये घुसखोरी प्रकरणी एनआयएकडून आठ ठिकाणी छापेमारी
युपीआयचा वापर, कृषी, औषध निर्मितीसह भारत- गयाना यांच्यात १० सामंजस्य करार
गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेत २६५ दशलक्ष डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप