भारतात ८ दिवसांपासून बेपत्ता असलेले बांगलादेशचे खासदार अन्वारुल अझीम अनार बुधवारी (२२ मे) कोलकाता येथील फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळून आले. बांगलादेशचे गृहमंत्री असदुझ्झमन खान यांनी कोलकाता पोलिसांच्या हवाल्याने याला दुजोरा दिला आहे.कोलकाता पोलिसांनी सांगितले की, न्यू टाऊन परिसरात खासदार अन्वारुल यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३ बांगलादेशींना अटक केली आहे. दरम्यान, ही पूर्वनियोजित हत्या असल्याचे सांगण्यात येत आहे.
वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, खासदार अन्वारुल १२ मे रोजी उपचारासाठी कोलकाता येथे आले होते. दुसऱ्याच दिवशी तो बेपत्ता झालेआणि त्याचा फोनही १३ मेपासून बंद होता.यानंतर १७ मे रोजी बिहारमधील एका भागात त्यांचा फोन काही काळासाठी चालू करण्यात आला होता.पोलिसांनी सांगितले की, खासदाराचा मोबाईल फोन काही काळासाठी चालू झाला होता तेव्हा त्याने आपल्या कुटुंबियांना मेसेज केला की,तो नवी दिल्लीला रवाना झाला आहे.
हे ही वाचा:
विशाल अग्रवालसह तिघांना तीन दिवसीय पोलीस कोठडी!
उपराष्ट्रपती धनखड इराणला रवाना, काय कारण?
अपघातानंतर पुणे महानगरपालिकेला आली जाग; अनधिकृत पबवर हातोडा!
न्यायालय परिसरात विशाल अग्रवालच्या अंगावर शाईफेकीचा प्रयत्न
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार अन्वारुल अझीम हे १२ मे रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांचे कौटुंबिक मित्र गोपाल बिस्वासला यांना भेटण्यासाठी त्यांच्या कोलकाता येथील घरी गेले होते.दुसऱ्या दिवशी दुपारी १.४१ वाजता डॉक्टरांना भेटण्याचे सांगून ते तेथून निघून गेले.संध्याकाळी परत येणार असल्याचे त्याने मित्राच्या घरी सांगितले.यानंतर खासदारने बिधान पार्कमधील कलकत्ता पब्लिक स्कूलसमोरून टॅक्सी पकडली.
संध्याकाळी त्याने गोपाल बिस्वासला व्हॉट्सॲप मेसेज पाठवून आपण दिल्लीला जात असल्याची माहिती दिली. यानंतर त्यांचा संपर्क तुटल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.बांगलादेशी दूतावासही पोलिसांच्या सतत संपर्कात आहे. बांगलादेश सरकारने या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवला आहे.दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी ३ बांगलादेशींना अटक केली आहे.खासदार अन्वारुल यांची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.