‘जॉय बांगला’ यापुढे बांगलादेशचा राष्ट्रीय नारा नाही!

बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती

‘जॉय बांगला’ यापुढे बांगलादेशचा राष्ट्रीय नारा नाही!

‘जॉय बांगला’ यापुढे बांगलादेशचा राष्ट्रीय नारा राहणार नाहीये. बांगलादेश सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणून ओळखले जाणारे शेख मुजीबुर रहमान ‘जॉय बांगला’ हा नारा प्रसिद्ध केला होता आणि बांगलादेश उच्च न्यायालयाने एका आदेशात ‘जॉय बांगला’ देशाचा राष्ट्रीय नारा म्हणून घोषित केला होता. मात्र, उच्च न्यायालयाच्या हा आदेश बांगलादेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे.

बांगलादेशच्या अंतरिम सरकारने १० मार्च २०२० रोजी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात २ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात अपील याचिका दाखल केली होती. सरन्यायाधीश सय्यद रेफात अहमद यांच्या अध्यक्षतेखालील चार सदस्यीय खंडपीठाने मंगळवारी या प्रकरणी हा आदेश दिला. राष्ट्रीय घोषणा हा सरकारच्या धोरणात्मक निर्णयाचा विषय असून न्यायपालिका त्यात हस्तक्षेप करू शकत नाही, असे आदेशात म्हटले. सुनावणीत सरकारची बाजू मांडणारे अतिरिक्त ऍटर्नी जनरल अनिक आर हक म्हणाले की, या आदेशानंतर ‘जॉय बांगला’ ही राष्ट्रीय घोषणा मानली जाणार नाही.
हे ही वाचा : 
प्रार्थनास्थळांना आव्हान देणारे नवे खटले दाखल होणार नाहीत!
एएमयूमधील बांगलादेशी विद्यार्थ्यांकडून भारत आणि महिलांबद्दल अपशब्द!
बांगलादेशात तलवारीच्या धाकावर केलं जातंय धर्मांतर
वक्फ बोर्ड म्हणते औसामधील १७५ एकर जमीन आमची! तळेगावनंतर नवा दावा
१० मार्च २०२० रोजी उच्च न्यायालयाने ‘जॉय बांगला’ हा देशाचा राष्ट्रीय नारा म्हणून घोषित केला होता. सर्व सरकारी कार्यक्रम आणि शैक्षणिक संस्थांच्या सभांमध्ये ही घोषणा वापरता यावी यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले होते. त्यानंतर २० फेब्रुवारी २०२२ रोजी हसीना शेख यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने एक नोटीस जारी करत ‘जॉय बांगला’ राष्ट्रीय घोषणा म्हणून मान्यता दिल्याचे म्हटले आणि अवामी लीग सरकारने २ मार्च २०२२ रोजी राजपत्र अधिसूचना जारी केली.
Exit mobile version