इस्कॉन बांगलादेशचे प्रवक्ते आणि पुंडरिक धामचे अध्यक्ष चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना ढाका पोलिसांनी मंगळवारी (२८ नोव्हेंबर) अटक केली. चिन्मय कृष्ण दास यांच्यासह त्यांच्या १९ साथीदारांना अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, इस्लामिक कट्टरतावादी आणि बांगलादेशातील मुहम्मद युनूस यांच्या सरकारला इस्कॉनला दहशतवादी संघटना घोषित करून त्यावर बंदी घालायची आहे.
बांगलादेशात भगवा ध्वज फडकावल्याबद्दल देशद्रोहाचा आरोप करत त्यांना अटक करण्यात आली होती. यानंतर बांगलादेश सरकारकडे त्यांच्या सुटकेसाठी भारतासह जगभरातील हिंदूंनी आवाहन केले. भारताच्या सत्ताधारी नेत्यांसह विरोधकांनी तीच मागणी केली. दोन दिवसांपूर्वी त्यांना न्यायालयातून नेत असताना अटकेविरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान एका वकिलाचा मृत्यू झाला होता. बांगलादेश सरकारकडून या प्रकरणाच्या तपासाचा आदेश देण्यात आले आहेत.
अशातच चिन्मय कृष्ण दास प्रभू यांच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. बांगलादेशच्या इस्कॉनने चिन्मय कृष्णा दास यांच्याशी आपले नाते तोडले आहे. याबाबत अधिकृत निवेदन जारी केले आहे. चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना तात्काळ इस्कॉनपासून वेगळे केले असून त्यांनी केलेल्या कोणत्याही वक्तव्याचा आणि त्यांच्या क्रियांचा इस्कॉनशी कोणताही संबंध नसल्याचे बांगलादेश इस्कॉनने म्हटले आहे.
हे ही वाचा :
संभलमधील दंगलखोरांचे फोटो प्रसिद्ध; अल्पवयीन मुलासांह महिलांचाही समावेश
हेमंत सोरेन बनले झारखंडचे मुख्यमंत्री, चौथ्यांदा घेतली शपथ!
भारतीय तपास यंत्रणांना मोठे यश, मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रवांडातून भारतात आणला!
एक दिवस असा येईल की, उद्धव ठाकरे देश सोडून जातील