बांगलादेश आजकाल हिंसाचाराच्या आगीत जळत आहे. सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनांनी देशभरात हिंसक रूप धारण केले आहे. आरक्षणावरून देशभरात पसरलेल्या घातक अशांततेच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशातील अधिकाऱ्यांनी देशव्यापी कर्फ्यू लागू केला आहे. एएफपी या वृत्तसंस्थेनुसार विद्यार्थी निदर्शक आणि पोलिस यांच्यातील संघर्षात किमान १०५ लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, बांगलादेश सरकारने १९७१ च्या स्वातंत्र्ययुद्धात पाकिस्तानसोबत लढलेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी सरकारी नोकऱ्यांमधील लागू केलेले ३० टक्के आरक्षण रद्द करण्याची मागणी निदर्शक करत आहेत. विद्यार्थी आंदोलकांनी शुक्रवारी (१९जुलै) मध्य बांगलादेशी जिल्ह्यातील नरसिंगदी येथील तुरुंगावर हल्ला केला आणि तेथील शेकडो कैद्यांची सुटका केली.
पंतप्रधान शेख हसीना यांनी राष्ट्राला दूरचित्रवाणीद्वारे संबोधित करत शांततेचे आवाहन केले आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विद्यार्थ्यांना चर्चेसाठी त्यांनी आमंत्रित केले आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थी सरकारचा प्रस्ताव स्वीकारतील की नाही, हे स्पष्ट नाही. सुरक्षेकरिता सरकारने सैन्य तैनात केले आहेत.
हे ही वाचा:
भाजपचे उद्या पुण्यात महाअधिवेशन
मराठा आरक्षणाकरिता जालन्यात मनोज जरांगेंचे पुन्हा उपोषण सुरु !
पोलिसांनी उद्ध्वस्त केले सेक्स रॅकेट, शेजारच्या मुलींनाच गुंतवले
ही शिवरायांसाठी नव्हे मतदारांप्रती सद्भावना यात्रा |
दरम्यान, बांगलादेशात तीन आठवड्यांपासून सुरू असलेले निदर्शने या आठवड्यात तीव्र झाले झाल्याने २४५ भारतीय नागरिक शुक्रवारी मायदेशी परतले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले की, निदर्शने ही बांगलादेशची अंतर्गत बाब आहे. सध्या बांगलादेशात राहणारे ८,५०० विद्यार्थ्यांसह १५,००० भारतीय सुरक्षित असल्याचे सांगितले.
दरम्यान, हसीनाच्या अवामी लीगच्या सदस्यांना लाभ देणाऱ्या ‘कोटा राजकारणा’विरुद्धच्या आंदोलनाचे नेतृत्व बांगलादेश मधील महाविद्यालये आणि विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी केले आहे. यामध्ये आतापर्यंत १०५ हून अधिक मृत्यू आणि दोन हजारहुन अधिक जखमी झाल्याची नोंद झाली आहे. हा प्रकार अशावेळी घडला आहे जेव्हा बांगलादेशात प्रचंड महागाई, कमी होत चाललेली परकीय गंगाजळी आणि वाढती बेरोजगारी टोकाला आहे. त्यामुळे बांगलादेश संकटात सापडला आहे.