हिंदुंवरील हिंसाचार प्रकरणी बांगलादेश सरकारला येतेय जाग!

मंदिर तोडफोड प्रकरणी चौघांना अटक

हिंदुंवरील हिंसाचार प्रकरणी बांगलादेश सरकारला येतेय जाग!

बांगलादेशातील हिंदूंवर सातत्याने होत असलेल्या हिंसाचारावर बांगलादेश सरकारने कारवाई सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने हिंदू मंदिरे आणि हिंदू समुदायाच्या लोकांच्या घरांची तोडफोड केल्याचा आरोप असलेल्या ४ जणांना अटक केली आहे.

बांगलादेशच्या कायदा अंमलबजावणी यंत्रणांनी उत्तर बांगलादेशातील सुनमगंज जिल्ह्यातून ४ आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी १२ जणांव्यतिरिक्त पोलिसांनी १५० ते १७० अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. अलीम हुसेन (१९), सुलतान अहमद राजू (२०), इम्रान हुसेन (३१) आणि शाहजहान हुसेन (२०) अशी अटक केलेल्या चार आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर सुनमगंज जिल्ह्यातील दोराबाजार भागात तोडफोड केल्याचा आरोप आहे.

हे ही वाचा: 

मुस्लिम बहुसंख्यांपेक्षा मोठे असू शकतात

नक्षलवाद्यांचा कमांडरच सांगतो आहे की, लोकांना बंदूक नको, विकास हवा!

तब्बल ४२ वर्षांनंतर संभलमध्ये शिव, हनुमान मंदिरात आरती

‘राम मंदिर बांधणाऱ्यांचा सन्मान झाला, ताजमहाल बांधणाऱ्यांचे हात कापले गेले’

३ डिसेंबर रोजी बांगलादेशातील सुनमगंज जिल्ह्यातील आकाश दासने फेसबुक पोस्ट केली होती. या पोस्टनंतर जिल्ह्यात तणाव निर्माण झाला होता. मात्र, नंतर आकाशने ती पोस्ट डिलीट केली. पण, बदमाशांनी पोस्टचे स्क्रीनशॉट शेअर करण्यास सुरुवात केली, त्यामुळे परिसरात हिंसाचार उसळला.

ढाका ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, पोलिसांनी पोस्ट टाकणाऱ्या आकाश दासला त्याच दिवशी ताब्यात घेतले होते. बदमाशांनी त्याच दिवशी त्याला पोलिस कोठडीतून हिसकावण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, सुरक्षेचा विचार करून पोलिसांनी त्याची बदली अन्य पोलीस ठाण्यात केली होती. संतप्त झालेल्या बदमाशांनी त्याच दिवशी लोकनाथ मंदिर आणि हिंदू समाजाच्या घरांवर आणि दुकानांवर हल्ला केला होता. या प्रकरणी ४ जणांना अटक करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती आहे.

Exit mobile version