बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान हसीना शेख यांनी देश सोडल्यानंतर अल्पसंख्यांकांवर विशेषतः हिंदूंवर मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. अजूनही काही ठिकाणी हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. दरम्यान, या हिंसाचारामुळे त्रस्त झालेल्या हिंदू समुदायाने आता सरकारकडे वेगळी मागणी केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात हिंदूंसाठी एक उपजिल्हा देण्याची मागणी हिंदू समुदायाकडून करण्यात आली आहे. याशिवाय हिंदूंसाठी स्वतंत्र बँका, स्वतंत्र बाजारपेठ आणि शाळा या सुविधाही उपलब्ध करून देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. तसेच संरक्षणाचीही मागणी केली आहे.
आरक्षणाच्या कोट्यावरून झालेल्या हिंसाचारात अल्पसंख्याकांना विशेषतः हिंदूंनो टार्गेट करण्यात आले. इस्लामिक जिहादी जमावाने केलेल्या हल्ल्यांमध्ये अनेक हिंदू आणि गैर-मुस्लिम लोकांना लक्ष्य केले गेले. हिंदूंची मंदिरे, घरांची तोडफोड करून हिंदूंची हत्या करण्यात आली. अशा परिस्थितीत हिंदूंच्या सुरक्षेसाठी भारतभरातून आवाज उठवला जात आहे. त्यामुळे हिंदूंच्या रक्षणासाठी जगभरातून मागणी होत आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) नुसार, बांगलादेशातील दंगलीत आतापर्यंत ६०० हून अधिक हिंदूंना जिहादी जमावाने वेढून ठार केले आहे. त्याच वेळी, स्थानिक मीडियाद्वारे पीडितांची संख्या यूएनएससीच्या संख्येपेक्षा अडीच पट अधिक असल्याचे सांगितले जात आहे. अनेक ठिकाणांहून हिंदू मुलींवर बलात्कार आणि सामूहिक बलात्काराच्या घटनाही समोर आल्या आहेत.
हे ही वाचा :
अजमेर सामूहिक बलात्कारप्रकरणी ६ जणांना जन्मठेप
मिरारोडमधून पाच बांगलादेशी महिलांना घेतले ताब्यात
‘आसाममध्ये ‘ती’ घटना घडली असती तर त्वरित न्याय झाला असता!’
बदलापूरप्रकरणात राजकारण करू नका