सत्तापालटानंतर बांगलादेश पुन्हा रुळावर, शाळा-महाविद्यालये उघडण्याचे आदेश !

शैक्षणिक संस्था सुरू झाल्याने ढाका शहरात अनेक ठिकाणी वाहनांची गर्दी

सत्तापालटानंतर बांगलादेश पुन्हा रुळावर, शाळा-महाविद्यालये उघडण्याचे आदेश !

बांगलादेशातील विद्यापीठे, माध्यमिक शाळा आणि महाविद्यालयांसह सर्व शैक्षणिक संस्था रविवारी (१८ ऑगस्ट) उघडण्यात आल्या आहेत. महिनाभराहून अधिक काळ बंद राहिल्यानंतर या संस्था पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. आरक्षणाच्या कोट्यावरून विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे शाळा, महाविद्यालये आणि सर्व शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या विरोधामुळे शेख हसीना यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन देश सोडावा लागला होता.

सरकारी नोकऱ्यांच्या आरक्षणाच्या कोट्यावरून बांग्लादेशात मोठा हिंसाचार उसळल्याने सर्व शैक्षणिक संस्था १७ जुलै रोजी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या होत्या. मात्र, आता सर्व सर्व शैक्षणिक संस्था उघडण्यात आल्या आहेत. बांगलादेशच्या अंतरिम सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने तसे निर्देश दिले आहेत. यापूर्वी शिक्षण मंत्रालयाने गुरुवारी (१५ ऑगस्ट) त्यांच्या अखत्यारीतील सर्व संस्था उघडण्याच्या सूचना जारी केल्या होत्या.

हे ही वाचा :

विमानातून ज्वलनशील पदार्थ नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवाशासह पाच जणांना बेड्या

स्थलांतर कसलं ? हिंदुना त्रास देणाऱ्यांचे ग्रहांतर करा !

मनोज जरांगेंच्या रॅलीत ५ लाख नव्हेत ८ हजार लोक !

चौधरी झुल्फिकार अली यांचा भाजपात प्रवेश !

 

बंगाली न्यूज चॅनल ‘समय टीव्ही’नुसार, अंतरिम सरकारच्या उपसचिव मोसममत रहिमा अख्तर यांनी १५ ऑगस्ट रोजी एक अधिसूचना जारी केली होती, ज्यात त्यांनी म्हटले होते की, मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्या सूचनेचे पालन करून, १८ ऑगस्टपासून सर्व शैक्षणिक संस्था चालू करण्यासाठी आवश्यक पावले उचलावे.

‘डेली स्टार’च्या बातमीनुसार, सकाळी शालेय विद्यार्थी ‘गणवेश’ परिधान करून आपापल्या संस्थांकडे जाताना दिसले, त्यापैकी अनेकांचे पालक त्यांच्यासोबत होते. शैक्षणिक संस्था सुरू झाल्यामुळे ढाका शहरात अनेक ठिकाणी वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. बांगलादेशमध्ये साप्ताहिक कामकाजाचा दिवस रविवार ते गुरुवार असा असतो.

Exit mobile version