बांगलादेश न्यायालयाने हिंदू साधू चिन्मय दास यांचा जामीन अर्ज फेटाळला!

एक महिन्यांहून अधिक काळ तुरुंगात कैद

बांगलादेश न्यायालयाने हिंदू साधू चिन्मय दास यांचा जामीन अर्ज फेटाळला!

बांगलादेशातील चट्टोग्राम येथील न्यायालयाने गुरुवारी (२ जानेवारी) देशद्रोहाच्या खटल्यात ढाका पोलिसांनी २५ नोव्हेंबर रोजी अटक केलेल्या हिंदू साधू चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे. एक महिन्यांहून अधिक काळ ते तुरुंगात कैद आहेत.

ढाकाहून चट्टोग्रामला गेलेल्या ११ सुप्रीम कोर्टाच्या वकिलांच्या टीमने मागितलेला जामीन अर्ज मेट्रोपॉलिटन सत्र न्यायाधीश मोहम्मद सैफुल इस्लाम यांनी सुमारे ३० मिनिटे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर फेटाळला, असे ढाकास्थित द डेली स्टारने वृत्त दिले आहे.

हे ही वाचा : 

सोडणार नाही, फडणवीस गरजले !

सात महीने खदखदणारे मस्साजोग कांड, निर्णायक वळणावर…

क्रीडा विभागात २१ कोटींचा घोटाळा करणारा मुख्य आरोपी गजाआड!

गडचिरोलीत नववर्षाची नवी पहाट; ताराक्कासह ११ कट्टर माओवादी शरण!

कोलकाता इस्कॉनचे उपाध्यक्ष राधा रमण यांनी सांगितले की, ही अत्यंत दुःखद बातमी आहे. आपल्याला माहित आहे की संपूर्ण जग हे पाहत होते. नवीन वर्षात चिन्मय प्रभूला स्वातंत्र्य मिळेल अशी आशा सर्वांना होती. मात्र ४२ दिवसांनंतरही आज झालेल्या सुनावणीत त्यांचा जामीन फेटाळण्यात आला. बांगलादेश सरकारने त्यांना न्याय मिळेल याची खात्री करावी, असे ते म्हणाले.

Exit mobile version