बांगलादेशच्या अंतरिम सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. शेख हसीना यांच्या कार्यकाळात खासदारांना दिलेले सर्व ‘डिप्लोमॅटिक पासपोर्ट’ सरकारने रद्द केले आहेत. या निर्णयामुळे माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पासपोर्टही रद्द करण्यात आला आहे. बांगलादेशच्या गृह विभागाने ही माहिती दिली. मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारने माजी पंतप्रधान शेख हसीना आणि अवामी लीग सरकारमधील माजी खासदारांचे डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द केले आहेत.
बांगलादेशच्या गृह विभागाने बुधवारी (२१ ऑगस्ट) संध्याकाळी सांगितले की, मागील सरकारच्या काळात खासदारांना जारी केलेले सर्व डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द केले जातील. विचारविनिमय करून हा निर्णय घेण्यात आल्याचे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
सूत्रांवर विश्वास ठेवला तर पासपोर्ट रद्द करण्यासाठी अंतरिम सरकारने काही कारणे दिली आहेत.यामध्ये मुख्य कारण म्हणजे शेख हसीना यांच्यावर आतापर्यंत ४४ हून अधिक गुन्हेगारी गुन्हे दाखल आहेत. अजून काही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी डिप्लोमॅटिक पासपोर्ट रद्द करणे आवश्यक असल्याचे अंतरिम सरकारने म्हटले आहे. त्यामुळे हसीना शेख यांच्यासह त्यांच्या कार्यकाळातील इतर खासदारांचे पासपोर्ट रद्द करण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
मुस्लिमांच्या लग्न-घटस्फोटाची नोंदणी काझींकडे न होता सरकार दरबारी होणार
एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब? धमकीनंतर प्रवाशांना उतरवले !
बदलापूर अत्याचार प्रकरण: संतप्त ग्रामस्थांकडून अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड
“गर्व आहे की संपूर्ण जग भारताचा विश्वबंधु म्हणून आदर करतंय”
दरम्यान, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. ढाका येथे १९ जुलै रोजी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अबू सईदच्या मृत्यूप्रकरणी शेख हसीना आणि इतर सहा जणांना आरोपी बनवण्यात आले. शेख हसीना बांगलादेशात परत आल्यास त्यांना उर्वरित आयुष्य तुरुंगात काढावे लागू शकते, असे मानले जात आहे. १९ जुलै रोजी ढाका येथील मोहम्मदपूर भागात पोलिसांनी केलेल्या गोळीबारात किराणा दुकानाचा मालक अबू सईद ठार झाला होता. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.