बांगलादेशी मुस्लिमांना आधी भारतीय व्हावे लागेल तरच…

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी ठेवल्या अटी

बांगलादेशी मुस्लिमांना आधी भारतीय व्हावे लागेल तरच…

आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी राज्यात राहणाऱ्या बंगाली भाषिक मुस्लिमांबाबत पुन्हा वक्तव्य केले आहे.बंगाली भाषिक मुस्लिमांना राज्यात मूळ निवासी दर्जा देण्यासाठी मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी काही अटी ठेवल्या आहेत.बंगाली भाषिक मुस्लिमांना बालविवाह आणि बहुपत्नीत्व यांसारख्या दुष्कृत्यांचा त्याग करावा लागेल, तरच त्यांना आसामचे मूळ रहिवासी ‘खिलोंजिया’ म्हटले जाईल, असे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले आहे.

यापूर्वीही मुख्यमंत्री सरमा यांनी बंगाली भाषिक मुस्लिमांबाबत वक्तव्य केले होते. त्यादरम्यान ते म्हणाले होते की, आसाममधील समाजकंटकांना बंगाली भाषिक मुस्लिम समुदाय जबाबदार आहे. या समुदायातील बहुतांश लोक बांगलादेशातून आलेले आहेत, असे ते म्हणाले होते.

हे ही वाचा :

केजरीवालांच्या अटके विरोधात इंडी आघाडीचा ‘आक्रोश’!

अमरावती: २० हुन अधिक प्रवाशांसह एसटी बस दरीत कोसळली!

केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेहमध्ये जवानांसोबत साजरी केली होळी!

‘वाईट प्रथा सोडा आणि महिलांना शिक्षित करा’
आसाममध्ये बंगाली भाषिक मुस्लिमांना मियाँ म्हणतात. मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, मियाँ येथील मूळ रहिवासी आहे की नाही हा वेगळा मुद्दा आहे. आम्ही म्हणतोय की, बंगाली भाषिक मुस्लिमांना जर मूळ बनायचे असेल तर त्यात काही हरकत नाही पण त्यांनी वाईट प्रथा सोडून महिलांना शिक्षणासाठी प्रवृत्त करावे लागेल. तरच त्यांना मूळनिवासी म्हणून म्हटले जाईल. त्यामुळे या लोकांना बालविवाह आणि बहुपत्नीत्व सोडून द्यावे लागेल.

आसामच्या चालीरीती आणि परंपरा स्वीकाराव्या लागतील
हेमंत बिस्वा सरमा यांनी आसामच्या संस्कृतीबद्दल सांगितले. ते म्हणाले की, आसाममध्ये मुलींची तुलना देवीशी केली जाते आणि आपल्या संस्कृतीत त्यांची दोन-तीनदा लग्ने होत नाहीत. आपला मुद्दा पुढे करत मुख्यमंत्री म्हणाले की, दोन-तीन बायका असणे ही आसामी संस्कृती नाही. त्यामुळे बंगाली भाषिक मुस्लिमांना इथले मूळ रहिवासी व्हायचे असेल तर त्यांना दोन-तीन बायका करता येणार नाहीत. ते पुढे म्हणाले की, मियाँ लोकांनी आसाममधील प्रथा आणि परंपरांचे पालन केले तरच ते मूळ रहिवासी मानले जातील, असे मुख्यमंत्री सरमा म्हणाले.

Exit mobile version