सहलीसाठी निघालेल्या शाळेच्या बसला आग, २४ जणांचा होरपळून मृत्यू!

बँकॉकमधील घटना

सहलीसाठी निघालेल्या शाळेच्या बसला आग, २४ जणांचा होरपळून मृत्यू!

थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये मोठा अपघात झाला आहे. सहलीसाठी निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसला आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत २५ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

बँकॉकच्या बाहेरील भागात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. परिवहन मंत्री सुरिया जंगरुंगकिट यांनी सांगितले की, बसमध्ये विद्यार्थी आणि शिक्षिका असे एकूण ४४ प्रवासी होते. हे सर्वजण शाळेच्या सहलीला जात होते. याच  दरम्यान, राजधानीच्या उत्तरेकडील उपनगर पाथुम थानी प्रांतात बसला आग लागली. या अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक तपासात, बसचा टायर फुटल्याने बसला आग लागल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा : 

लैंगिक छळवणूक प्रकरणी नायर रुग्णालयातील डीनची बदली!

महाराष्ट्रात फक्त देशी गायीलाच राज्यमातेचा दर्जा का?, जर्सी गायीला का नाही?

लाडकी बहीण योजना : सेवा शुल्क कपात केला तर कारवाई

एआयएक्ससीची विमाने एआयएक्स एअर ऑपरेटर प्रमाणपत्रावर हस्तांतरित

ते पुढे म्हणाले, आग एवढी भीषण होती की काही वेळातच संपूर्ण बसने पेट घेतला. अचानक घडलेल्या घटनेमुळे अनेक मुले बसमध्येच अडकली आणि आगीत होरपळली. काही विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात यश आले, आगीमुळे ते भाजले गेले होते. विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांचा उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार उचलेल आणि पीडितांच्या कुटुंबीयांना भरपाई देईल, असे परिवहन मंत्री सुरिया जंगरुंगकिट यांनी सांगितले.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुलांचे वय आणि इतर माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Exit mobile version