बंगळूरूमधील पाणी संकटाची झळ थेट कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना

बंगळूरूमध्ये सध्या पाण्याची भीषण टंचाई सुरू

बंगळूरूमधील पाणी संकटाची झळ थेट कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना

कर्नाटकमधील बंगळूरूमध्ये सध्या पाण्याची भीषण टंचाई सुरू असून याची झळ आता थेट कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांना बसली आहे. दरम्यान, त्यांनी जनतेला आश्वासन दिले आहे की, सरकार कोणत्याही किंमतीत बंगळूरूला पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी काम करेल. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अपुऱ्या पाणी पुरवठ्याची व्यथा मांडली.

डी के शिवकुमार हे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, “बंगळुरूच्या सर्व भागात पाण्याचे संकट आहे. शिवाय त्यांच्या घरातील बोअरवेलही कोरडी पडली आहे.” पाण्याच्या भीषण संकटाचा सामना करत आहोत, परंतु कोणत्याही किंमतीत शहराला पाणीपुरवठा सुनिश्चित करू, असे आश्वासन डी के शिवकुमार यांनी जनतेला दिले आहे.

डी के शिवकुमार म्हणाले की, “आम्ही गंभीर पाणी संकटाचा सामना करत आहोत, परंतु कोणत्याही परिस्थितीत शहरात पाणीपुरवठा सुनिश्चित करू. पाण्याचे टँकर जास्त पैसे घेत आहेत. अत्यल्प पावसामुळे बोअरवेल कोरड्या पडल्याने बंगळुरूला तीव्र पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे. निवासी सोसायट्यांमधील रहिवाशांना दैनंदिन गरजांसाठी पाणी वापरताना काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. या संकटाच्या काळात अनेक खाजगी पाण्याचे टँकर पाण्याच्या बदल्यात रहिवाशांकडून अधिक पैशांची मागणी करत आहेत.”

हे ही वाचा:

“५० वर्षे पवारांचे ओझे महाराष्ट्र वाहतो आहे”

हिटमॅन ऱोहित… अब की बार ६०० पार

कारागृहातील कैद्यांवर दहशतवाद्यांची नजर, ब्रेनवॉशचा प्रयत्न!

आपल्या सहकाऱ्याचे पैसे चोरून पाकिस्तानी बॉक्सर पळाला!

दरम्यान, उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी केंद्र सरकारवर टीका करत मेकेडाटू जलाशय प्रकल्प थांबवल्याचा आरोप केला आहे ज्यामुळे बेंगळुरूमधील पाण्याची समस्या सुटू शकली असती. बंगळुरूला पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने मेकेडाटू प्रकल्प सुरू केला होता. केंद्रावर दबाव आणूनही तो मंजूर झाला नाही. जलसंकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन किमान आता तरी केंद्र सरकारने या प्रकल्पाला मंजुरी द्यावी

Exit mobile version