बांदीपोरामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार!

सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरु

बांदीपोरामध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार!

जम्मू-काश्मीरमधील अलुसा बांदीपोरा येथील जेत्सून जंगल परिसरात मंगळवारी (५ नोव्हेंबर) दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चकमकीमध्ये सुरक्षा दलाकडून एक दहशतवादी ठार करण्यात आला आहे. दरम्यान, अजूनही चकमक सुरु आहे.

बांदीपोरा पोलिस आणि २६ आसाम रायफल्सचे संयुक्त पथक या कारवाईत सहभागी आहेत. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसरात नाकाबंदी केली आहे. या भागात आणखी काही दहशतवादी असण्याची शक्यात वर्तवली जात आहे. एक दहशतवादी ठार झाल्याची सध्या माहिती असून संपूर्ण माहितीची प्रतीक्षा आहे. सुरक्षा दलांकडून परिसरात शोध मोहीम सुरु आहे.

हे ही वाचा : 

महाराष्ट्रातील महिलांनी जागे होण्याची वेळ!

‘हिंदूंवरील हल्ल्याच्या निषेधार्थ बजरंग दल मुंबईतील कॅनडाच्या दूतावासासमोर करणार आंदोलन’

२५ नोव्हेंबरपासून अधिवेशन; वक्फ विरोधी विधेयक, ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर चर्चा

‘औरंगजेबाने देशाला लुटले आणि मंत्री आलमगीरने झारखंडला लुटले’

दरम्यान, याआधी रविवारी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी गजबजलेल्या लाल चौक भागात ग्रेनेडने हल्ला केला होता. या हल्ल्यात १२ जण जखमी झाले होते. त्यामुळे परिसरात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलीस आणि सुरक्षा दल तपास करत आहेत.
Exit mobile version