28 C
Mumbai
Wednesday, September 18, 2024
घरविशेषबंगाल बंद: भाजप नेत्याच्या गाडीवर बॉम्ब, गोळीबाराची घटना !

बंगाल बंद: भाजप नेत्याच्या गाडीवर बॉम्ब, गोळीबाराची घटना !

भाजपकडून टीएमसी कार्यकर्त्यांवर आरोप

Google News Follow

Related

प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरच्या बलात्कार-हत्येप्रकरणाच्या निषेधार्थ काल (२७ ऑगस्ट) विद्यार्थ्यांनी ‘नबन्ना अभियान’ मोर्चाचे आयोजन केले होते. त्यानुसार आंदोलक विद्यार्थ्यांनी पश्चिम बंगाल सरकारच्या सचिवालयाच्या दिशेने कूच केली. मात्र, पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रूधुराच्या नळकांड्या आणि पाण्याचा मारा करत आंदोलकांना पांगवले. इवढेच नाहीतर आंदोलनात सहभागी असलेल्या एकूण २०० हून अधिक लोकांना ताब्यात घेतले. डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलकांना अटक केल्याप्रकरणी भाजपकडून बुधवारी (२८ ऑगस्ट) बंगाल बंदची हाक देण्यात आली होती. दरम्यान, या बंदमध्ये भाजप नेत्याच्या गाडीवर बॉम्ब फेकल्याची घटना घडली आहे, तसेच गोळीबार झाल्याचीही माहिती आहे.

भाजपकडून बंद पुकारण्यात आल्यानंतर आज कोलकातामध्ये रस्त्यावरील गर्दी कमी दिसली. बसेस, रिक्षा, टॅक्सी आणि खासगी वाहनांच्या संख्याही कमी दिसल्या. मात्र, बाजारपेठा आणि दुकाने पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत. शाळा-महाविद्यालये सुरू आहेत, पण बहुतांश खासगी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती खूपच कमी आहे कारण त्यांना घरून काम करण्यास सांगण्यात आले आहे.

हे ही वाचा :

युपीचे नवे सोशल मिडिया धोरण, देशविरोधी पोस्ट केल्यास ‘जन्मठेप’

अरुणाचल प्रदेशात लष्कराचा ट्रक दरीत कोसळून अपघात; तीन जवान हुतात्मा

मुडा घोटाळ्यानंतर आणखी एक जमीन घोटाळा !

वलसाडमधील उंबरगावमध्ये तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; आरोपीच्या आवळल्या मुसक्या

दरम्यान, भाजप पक्षाचे नेते प्रियंगू पांडे यांनी बुधवारी दावा केला की, पश्चिम बंगालच्या उत्तर २४ परगना जिल्ह्यातील भाटपारा भागात टीएमसी कार्यकर्त्यांनी त्यांच्या कारवर हल्ला केला आणि गोळीबारही केला. आपल्या गाडीवर बॉम्ब फेकल्याचा आरोपही त्यांनी केला. यादरम्यान ६-७ राउंड गोळीबारही करण्यात आले. तृणमूल काँग्रेसचे हे षडयंत्र असल्याचा दावा त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, माझी सुरक्षा काढून घेण्यात आल्यानंतर ही घटना घडली. या घटनेत ड्रायव्हरलाही गोळी लागली. या हल्ल्यात एकूण सात जण जखमी झाले तर यापैकी दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
177,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा