टीएमसी प्रवक्त्यांना वृत्तवाहिन्यांवर जाण्यास मज्जाव

टीएमसी प्रवक्त्यांना वृत्तवाहिन्यांवर जाण्यास मज्जाव

आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील एका डॉक्टरच्या बलात्कार-हत्येबद्दल सुरू असलेल्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने आपल्या पक्षाच्या प्रवक्त्यांना मध्यमामध्ये न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी टीएमसीने काही माध्यमावर राज्याच्या विरोधात बातम्या दिल्याचा आरोप केला आहे.

वृत्तवाहिन्यांना बंगाली विरोधी म्हणून लक्ष्य करताना पक्षाने आपल्या प्रवक्त्यांना त्या टीव्ही चॅनेलवर येण्यापासून परावृत्त करण्याचे निर्देश दिले. आरजी कार बलात्कार-हत्या प्रकरणातील नैतिक जबाबदारीपासून मुक्त होण्याचा प्रयत्न केल्याबद्दल काही वृत्तवाहिन्यानी पश्चिम बंगाल सरकारला धारेवर धरले होते.

हेही वाचा..

निषाद कुमारची २.०४ मीटर ‘उंच उडी’ मारत रौप्य पदकाला गवसणी

पॅरालिम्पिकमध्ये प्रीती पालने पटकावले आणखी एक कांस्य पदक

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करणारे तिघे ताब्यात

मद्यधुंद प्रवाशाने बेस्ट बसच्या ड्रायव्हरकडून स्टेअरिंग हिसकावलं आणि…

पश्चिम बंगालमधील कायदा आणि सुव्यवस्था आणि महिलांच्या सुरक्षेवरून लक्ष विचलित करण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी त्यांच्याच सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा कसा काढला ? हे यापूर्वी स्पष्ट झाले आहे.

Exit mobile version