23 C
Mumbai
Sunday, December 29, 2024
घरविशेषपिटावर बंदी घाला- अमूलचे पंतप्रधानांना पत्र

पिटावर बंदी घाला- अमूलचे पंतप्रधानांना पत्र

Google News Follow

Related

प्राण्यांच्या संरक्षणासाठी काम करणाऱ्या पिटा  अर्थात पीपल फॉर इथिकल ट्रीटमेंट ऑफ ऍनिमल्स आणि भारतातील सर्वात मोठी सहकारी तत्वावर दूध उत्पादन करणारी कंपनी अमूल यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे. पिटा  या आंतरराष्ट्रीय संस्थेने भारतातील १० कोटी रोजगार नष्ट करण्याचा घाट घातला असून त्यावर लवकरात लवकर बंदी आणावी अशी मागणी अमूलचे व्हाईस चेअरमन वालमजी हंबाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

विगन  दूध तयार करा हा पिटा चा सल्ला म्हणजे भारतातील सहकारी दूध उत्पादक संस्था संपवण्याचं आणि देशातील रोजगार नष्ट करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप अमूलने केला आहे. अमूलसारख्या मोठ्या दूध उत्पादक संस्थेच्या प्रतिमेला तडा द्यायचा आणि त्या माध्यमातून देशातले १० कोटी रोजगार नष्ट करायचे हा पिटा चा डाव असल्याचा आरोपही अमूलच्या वतीनं करण्यात आला आहे.

पिटा ने अमूल या भारतातल्या सर्वात मोठ्या सहकारी तत्त्वावरील दूध उत्पादक कंपनीला एक अजब सल्ला दिला आहे. अमूल या कंपनीनं आता गाईच्या दुधाच्या ऐवजी विगन  मिल्क उत्पादनाकडे वळावं, त्यातच भविष्य आहे असं पिटा नं एका पत्राद्वारे अमूल कंपनीला कळवले आहे.

पिटा च्या या पत्राला प्रत्युत्तर देताना अमूल कंपनीचे सीईओ आर. एस. सोढी म्हणाले की, “जर अमूल कंपनीनं गाईच्या दुधाचे उत्पादन थांबवलं तर भारतातल्या १० कोटी शेतकऱ्यांना रोजगार कोण देणार? आपल्याला माहिती नाही का बहुतेक दूध उत्पादक शेतकरी भूमिहीन असतात. आपल्या सल्यामुळं त्यांचं उपजीविकेचे एकमेव साधन नष्ट होईल. आपल्या परंपरेतच दुधाचा वापर आहे. त्यामुळे विगन  दुधाच्या मागे लागणे योग्य नाही.”

विगन  दुधाचे उत्पागन सुरु केल्यास शेतकऱ्यांचे रोजगार जाणार नाहीत, उलट यामुळे प्राण्यांवर होणारे अत्याचार थांबतील आणि दुधापासून आपल्या शरीरावर होणारे दुष्परिणाम देखील होणार नाहीत. भारतात गायींना दूध देण्यासाठी त्रास दिला जातो, त्यांना दुभतं ठेवलं जातं, जेव्हा त्यांचे शरीर दूध देणे बंद करते तेव्हा त्यांना कत्तलखान्यात विकलं जातं आणि मांस मिळवलं जातं’, असं पिटा  इंडियाचं म्हणणं आहे.

हे ही वाचा:

गृहमंत्र्यांनी स्वत: अदर पुनावालांना सुरक्षेची हमी द्यावी- न्यायालयाचे निर्देश

परदेशी लशींचा भारतात येण्याचा मार्ग मोकळा

सुशांत सिंह राजपूत प्रकरण, ड्रग पेडलर हरीश खानला अटक

आता कोरोनामुळे मृत झालेल्यांना ४८ तासांत मिळणार ५० लाख

विगन  दुधाचे अनेक प्रकार सध्या जगात उपलब्ध आहेत. विगन  दूध हे नारळ, काजू, बदाम आणि मुख्यतः सोया पासून बनवलं जातं. सध्या बाजारात अनेक नागरिक या दुधाला पसंती देत आहेत. गाईच्या दुधापेक्षा विगन  दूध हे जास्त फायदेशीर असतं असा दावा पिटा  इंडियानं केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा