बॉलीवूडमध्ये अनेकवेळा हिंदू देवीदेवतांची चेष्टा करण्यात आली. अन्य धर्मियांच्या देवीदेवतांवर असे कोणतेही भाष्य न करणाऱ्या बॉलीवूडच्या या पक्षपाती वर्तनावर आता टीका होऊ लागली आहे. पीकेसारख्या चित्रपटात देवीदेवतांची उडवलेली खिल्ली लक्षात घेता लालसिंह चढ्ढा या चित्रपटावर बहिष्कार घाला अशी मोहीम सध्या राबविण्यात येत आहे. त्यावरून एका कारचालकाचा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. त्याने का आवाहन केले आहे, बॉलीवूडच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचे?
लोकांना जागृत कऱण्यासाठी मी हे करत आहे. या व्हीडिओमध्ये त्याला त्याच्या या आवाहनाबाबत विचारणअयात आल्यावर तो म्हणतो की, आम्ही एका हिरोला लोकप्रिय केले, त्याच्या चित्रपटांना डोक्यावर बसवले. त्याची जात कोणती, धर्म कोणता याचाही कधी विचार केला नाही, पण शिखरावर पोहोचल्यावर त्याने या देशात आपल्याला भीती वाटत असल्याची भावना व्यक्त केली होती.
तो चालक म्हणतो की, आमीर खान हे बघ भीती तर आम्हाला वाटते आहे. घरातले लोक काश्मीरला जाताना त्यांना भीती वाटते. कन्हैय्याकुमारचे शीर धडावेगळे केले जाते तेव्हा भीती वाटते. तुला कसली भीती वाटते. तू आपल्या मुलीचे वाढदिवस साजरा करतानाचे उघडेनागडे फोटो शेअर करशील आणि तुझी अपेक्षा आहे की, तुझ्यासारख्या अशा व्यक्तीचे चित्रपट आम्ही पाहावेत?
हे ही वाचा:
“पाकिस्तानी खेळाडू पदकं जिंकत आहेत हे नेत्यांना माहित आहे का?” पाक पत्रकाराचा सवाल
संजय राऊत २२ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत
औरंगजेब चांगला; मग शिवाजी महाराज वाईट होते की काय ?
त्याच्या फिल्मवर बहिष्कार टाका. जे लोक त्याचे समर्थन करत आहेत, त्यांनी आपल्या मुलामुलींचे असे फोटो सोशल मीडियावर टाकावेत. आम्ही या लोकांना डोक्यावर बसवतो आणि हे आमच्या डोक्यावर नाचू लागतात. मला या अशा दुटप्पी लोकांचा राग येतो. मी बॉलीवूडच्या फिल्मवर बहिष्कार घाला असे आवाहन करतो.
या चालकाने आपल्या छोट्या गाडीच्या मागील बाजूस एक बॅनर लावले आहे. त्यावर मोठ्या अक्षरात बॉलीवूड चित्रपटांवर बहिष्कार घाला असे आवाहन केले आहे. जे भारतातील देवीदेवतांचा अपमान करतात, ज्यांना देशावर प्रेम नाही, जे धार्मिक परंपरांची थट्टा उडवतात त्यांच्या चित्रपटांवर बहिष्कार घाला.